भिवंडीत राष्ट्रवादीने प्रतीकात्मक मोदींना बांधली राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST2021-08-22T04:42:46+5:302021-08-22T04:42:46+5:30

नितिन पंडीत भिवंडी - रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणींच्या नात्यातील एक अविस्मरणीय दिवस. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते, तर भाऊ ...

In Bhiwandi, the NCP tied the symbolic Modi | भिवंडीत राष्ट्रवादीने प्रतीकात्मक मोदींना बांधली राखी

भिवंडीत राष्ट्रवादीने प्रतीकात्मक मोदींना बांधली राखी

नितिन पंडीत

भिवंडी - रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणींच्या नात्यातील एक अविस्मरणीय दिवस. बहीण भावाच्या हातावर राखी बांधते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाची ओवाळणी देतो. याच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष स्वाती कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने केलेल्या गॅस दरवाढीचा आंदोलनातून निषेध केला. त्यांनी प्रतीकात्मक मोदींना रक्षाबंधन करून गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी केली.

जकात नाका येथील स्व. आनंद दिघे चौकात आयोजित कार्यक्रमात एका व्यक्तीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा मास्क लावला होता. त्या प्रतीकात्मक मोदींची ओवाळणी करीत त्यांच्या हातावर कांबळे यांनी राखी बांधली व त्यांना गॅस सिलिंडर भेट देऊन ‘आम्ही आमचे रक्षण करण्यासाठी समर्थ आहोत. तुम्ही फक्त गॅस सिलिंडरच्या किमती कमी करा,’ अशी मागणी केली. ‘मोदी भय्या, राखी के बंधन को निभाना, गॅस का दाम कम कराना’ अशी ओवाळणी गीत गात केलेले हे अभिनव आंदोलन सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.

Web Title: In Bhiwandi, the NCP tied the symbolic Modi