भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती सभापती पदावर महिला राज ; पाचही सभापतींची बिनविरोध निवड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:15 PM2020-10-26T17:15:55+5:302020-10-26T17:16:38+5:30

प्रभाग समिती सभापती उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये दोन अर्ज दाखल झाले होते .

Bhiwandi Municipal Corporation Ward Committee Chairperson Mahila Raj; Unopposed election of all the five Speakers | भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती सभापती पदावर महिला राज ; पाचही सभापतींची बिनविरोध निवड 

भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती सभापती पदावर महिला राज ; पाचही सभापतींची बिनविरोध निवड 

Next

नितिन पंडीत

भिवंडी :  भिवंडी महानगरपालिकेेे च्या पाचही प्रभाग समिती सभापती पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोमवारी या पाचही सभापती पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली हि निवडणूक पार पाडली. हि निवडणूक ऑनलाइन पद्धतीने पार पाडली असूूू 

कारी असून पाचही प्रभागांमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली असून पाचही प्रभागांवर महिलांची बिनविरोध निवड झाल्याने पाचही प्रभाग समित्यांवर महिला राज स्थापित झाले असून पाच प्रभागांमध्ये चार प्रभाग समितीवर काँग्रेसचे तर एका प्रभाग समीती भाजपाचे प्रतिनिधी बिनविरोध निवडून आले आहेत. 

               प्रभाग समिती सभापती उमेदवारी अर्ज दाखल करताना फक्त प्रभाग समिती क्रमांक एक मध्ये दोन अर्ज दाखल झाले होते . परंतु आरपीआय एकतावादीचे उमेदवार शरद नामदेव धुळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रभाग समिती क्रमांक एक वर काँग्रेसच्या नगरसेविका कशाफ अश्रफ खान , प्रभाग समिती क्रमांक २ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका रजिया नासिर खान ,प्रभाग समिती क्रमांक ३ मध्ये भाजपच्या नगरसेविका 

नंदिनी महेंद्र गायकवाड , प्रभाग समिती क्रमांक ४ मध्ये काँग्रेसच्या नगरसेविका नाजीमा मोहम्मद हदीस अन्सारी ,प्रभाग समिती क्रमांक ५ मध्ये काँग्रेसचे नगरसेविक फराज फजल बहाउद्दीन या उमेदवारांचे एकमेव अर्ज दाखल असल्याने पिठासन अधिकारी निधी चौधरी यांनी सर्व प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली . ५ पैकी ४ काँग्रेस तर एका समितीवर भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आले असून प्रभाग समिती सभापती पदावर महिलांचा दबदबा राहिला असून ५ पैकी ४ महिला सभापती निवडून आल्या आहेत . सर्व नवनिर्वाचित सभापतींचे पिठासन अधिकारी निधी चौधरी ,आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी गुलाब पुष्प सह नगरपालिका सभा शास्त्र हे पुस्तक देऊन शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे .

Web Title: Bhiwandi Municipal Corporation Ward Committee Chairperson Mahila Raj; Unopposed election of all the five Speakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.