भिवंडी महापालिका प्रभाग समितीसभापती निवडणुक; पिठासन अधिकाऱ्यांनी निकाल ठेवला होता रोखून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 20:20 IST2021-12-23T20:17:46+5:302021-12-23T20:20:01+5:30
नगरसेवकांच्या अनुपस्थितीने पिठासन अधिकाऱ्यांनी निकाल ठेवला होता रोखून

भिवंडी महापालिका प्रभाग समितीसभापती निवडणुक; पिठासन अधिकाऱ्यांनी निकाल ठेवला होता रोखून
- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी पालिका प्रभाग समिती क्रमांक १ ते ५ च्या सभापती पदाची निवडणूक गुरुवारी पालिका सभागृहात पिठासन अधिकारी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यासी अध्यक्षतेखाली दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली होती .या वेळी सर्वप्रथम प्रभाग समिती क्र एक व दोन च्या निवडणुका घेऊन त्यानंतर बिनविरोध निवड झालेल्या प्रभाग समिती तीन , चार व पाच या तीन प्रभाग समितीच्या बिनविरोध निवडणुकीच्या घोषणा करीत असताना पिठासन अधिकारी डॉ नार्वेकर यांनी प्रभाग निहाय उपस्थित सभासदांची नोंद घेतली असता सभा गणपूर्ती साठीची सभासद संख्या कमी असल्याने निवड जाहीर करणे अडवून ठेवले होते.
निवड जाहीर करणे रोखून ठेवल्याने बिनविरोध नगरसेवक व त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढून अनुपस्थित नगरसेवकांना घरून उचलून आणण्यासाठी पळापळ सुरू झाली होती. त्यामध्ये काही नगरसेवक शहरा बाहेर असल्याने फोनाफोनी केल्या नंतर कोणी शहापूर तर कोणी मुलुंड येथून सभागृहात उपस्थित राहण्यासाठी धावत पळत आल्याने तब्बल दोन तास ही सभापती निवडीची सभा सुरू राहिली होती अखेर गणपूर्तीनंतर निकाल जाहीर करण्यात आला असतांना समर्थकांनी एकच जल्लोष केला मात्र पिठासन अधिकाऱ्यांनी निकाल रोखून ठेवल्याने उमेदवार नगरसेवक व त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी धाकधूक वाढली असल्याचे पाहायला मिळाले.