शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

भिवंडी महापालिका महापौरपद निवडणुकीत घोडेबाजार; काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 16:44 IST

भिवंडी महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्यात आली.

भिवंडी: भिवंडी महापालिकेत गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आर्थिक घोडेबाजार अखेर चव्हाट्यावर आला असून भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या आहेत तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान हे विजयी झाले आहेत . त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस शिवसेना युती गटाला जबरदस्त धक्का बसला आहे.  

भिवंडी महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी 12 वाजता निवडणूक घेण्यात आली. महापौर पदासाठी कॉग्रेस तर्फे रिषिका राका व भाजप - कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात असल्याने पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय ( एकतावादी ), समाजवादी पक्ष व भाजप बरोबरच काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी कोणार्कच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मतांनी विजयी झाल्या. तर शिवसेना काँग्रेस युतीच्या नगरसेविका रिषिका राका यांना अवघी 41 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. 

विशेष म्हणजे भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक असून त्यापैकी 18 नगरसेवक कोणार्क विकास आघाडीकडे गेल्याने त्यांचा दारुण पराभव झाल्याने काँग्रेस व शिवसेनेला सत्तेपासून पायउतार व्हावे लागले आहे. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत सुद्धा भाजप व कोणार्क विकास आघाडीने पुरस्कृत केलेल्या काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांना 49 मते मिळाली . त्यांनी सेनेचे जैष्ठ नगरसेवक बाळाराम चौधरी यांचा पराभव केला . चौधरी यांना 41 मते मिळाली. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाला लाथाडून सरळ भाजप कोणार्क विकास आघाडीला उघडपणे साथ दिली. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. भिवंडी महापालिकेत 90 नगरसेवक असून त्यामध्ये कॉग्रेसचे 47, शिवसेना 12, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 4, समाजवादी पार्टी 2, आरपीआय (एकतावादी ) 4, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेसकडे बहुमत असूनही नगरसेवक फुटीची शक्यता लक्षात घेता 2017 मध्ये काँग्रेसने शिवसेनेच्या 12 नगरसेवकांना सोबत घेऊन सेनेला सत्तेत वाटा दिला होता . त्यामुळे भाजप व कोणार्क विकास आघाडीला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. याची सल भाजप कोणार्क विकास आघाडीला होती. त्यामुळे आज झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना फोडून महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. विधानसभेपाठोपाठ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीची सत्ता ठिकठिकाणी स्थपन होत असतांना बहुमत असूनही काँग्रेस शिवसेनेला भिवंदि महापालिकेत सत्तेपासून दुररहावे लागले आहे . त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना भिवंडीतून जोरदार धक्का बसला आहे. 

खराब रस्ते व वाहतूक कोंडीचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना फटका 

भिवंडी महानगर पालिकेत महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक गुरुवारी दुपारी 12 वाजता मुबई उपनगराचे जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती मात्र भिवंडीतील खराब रस्ते व वाहतूककोंडीमुळे निवडणूक निर्णय अधिकारी या निवडणुकीसाठी उशिरा पोहचल्याने हि निवडणूक जवळपास 20 मिनिटे उशिरा सुरु झाली . 

निवडणूक प्रक्रिया सुरु असतांना काँग्रेस पक्षाचे व्हीप वाटप 

दरम्यान या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अंसारी यांनी सभागृहात निवडणूक प्रक्रिया सुरु असतांना काँग्रेसच्या नगरसेवकांना जबरदस्तीने पक्षाचे व्हीप वाटप सुरु केले त्यावर काँग्रेसचे नगरसेवक इम्रान खान यांनी आक्षेप घेत व्हीप वाटपाचे काम बंद पाडले.विशेष म्हणजे काँग्रेसगटनेते हलीम अन्सारी यांनी सुरुवातीला काँग्रेस उमेदवार रिषिक राका यांच्या नावाने दोन दिवसांपूर्वी पक्षाचा व्हीप जाहीर केला असतांना आज प्रत्यक्षात निवडणुकीच्या दिवशीच वर्तमानपत्रात कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा विलास पाटील यांना मतदान करा अशी जाहिरात खुद्द काँग्रेस गटनेत्यांनी दिल्याने तंटा निर्माण झाला होता. मात्र काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अंसारी यांनी सदरचा दुसरा व्हीप हा खोटा असून विरोधकांनी केलेले कारस्थान आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . मात्र दोन दोन व्हीप जाहीर केल्याने महापौर व उपमहापौर निवडणुकीत होणार आर्थिक घोडेबाजार देखील चाव्हत्यावर आला आहे.  

टॅग्स :Bhiwandiभिवंडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाMayorमहापौर