शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी: काँग्रेसच्या १८ बंडखोर नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द; एकनाथ शिंदेंच्या खात्याचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:44 IST

5 डिसेंबर 2019 मध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार यांच्या विरोधात मतदान करून बंडखोरी केली होती.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटले होते. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या विजयी झाल्या होत्या. तर उपमहापौर पदावर कोणार्क पुरस्कृत काँग्रेसचे नगरसेवक इम्रान वली मोहम्मद खान हे विजयी झाले होते. या १८ बंडखोर नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

भिवंडी महानगरपालिकेतील 18 बंडखोर काँग्रेस नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यासह या नगरसेवकांना पुढील 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. नगरविकास विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाल दिला आहे. 

5 डिसेंबर 2019 मध्ये महापौर व उपमहापौर निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार यांच्या विरोधात मतदान करून बंडखोरी केली होती. त्या विरोधात माजी महापौर जावेद दळवी यांनी सदस्यत्व रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती. 

काय घडलेले राजकारण...महापौर पदासाठी कॉग्रेस तर्फे रिषिका राका व भाजप - कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील या रिंगणात असल्याने पीठासीन अधिकारी जोंधळे यांनी हात वर करून मतदान घेतले. या मतदान प्रक्रियेत कोणार्क विकास आघाडीसह आरपीआय ( एकतावादी ), समाजवादी पक्ष व भाजप बरोबरच काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी कोणार्कच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना मतदान केल्याने त्या 49 मतांनी विजयी झाल्या. तर शिवसेना काँग्रेस युतीच्या नगरसेविका रिषिका राका यांना अवघी 41 मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. 

भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे एकूण 47 नगरसेवक होते. तिथे काँग्रेस आणि शिवसेनेतची सत्ता होती. भिवंडी महापालिकेत 90 नगरसेवक असून त्यामध्ये कॉग्रेसचे 47, शिवसेना 12, भाजप 20, कोणार्क विकास आघाडी 4, समाजवादी पार्टी 2, आरपीआय (एकतावादी ) 4, अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल होते.

टॅग्स :bhiwandiभिवंडीcongressकाँग्रेसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे