शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आठ लोकसभा जिंकणाऱ्या काँग्रेसची भिवंडीतून निशाणी गायब

By नितीन पंडित | Updated: April 6, 2024 13:10 IST

Bhiwandi Lok Sabha Constituency: भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सुरेश तथा बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून पक्षाची निशाणी रिंगणाबाहेर गेली.

- नितीन पंडितभिवंडी - भिवंडी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सुरेश तथा बाळ्या मामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघातून पक्षाची निशाणी रिंगणाबाहेर गेली. स्वातंत्र्यानंतर झालेल्या अनेक लोकसभा निवडणुकीत काही अपवाद वगळता भिवंडीकरांनी काँग्रेसला मतदान केले होते. केवळ भिवंडीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून भिवंडीपर्यंत (मुंबई वगळता) कोकण पट्ट्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघांत आता काँग्रेसचा उमेदवार नाही.

स्वातंत्र्यानंतर आधी डहाणू मतदारसंघात भिवंडी लोकसभा मतदारसंघात सध्या असलेला परिसर समाविष्ट होता. २००९ साली मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भिवंडी हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ झाला. १९६७ पासून ते २०१९ पर्यंत भिवंडीतील ज्या मतदारांनी काँग्रेसला मतदान केले. त्यांना यावेळी  काँग्रेसचे चिन्ह ईव्हीएममध्ये दिसणार नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डहाणू लोकसभा हा अनुसूचित जमातीसाठी राखीव होता. गुजरातच्या सीमेवरील तलासरी येथून सुरू होणारा हा मतदारसंघ कसारा घाटासह मुरबाडच्या माळशेज घाटापर्यंत भौगोलिकदृष्ट्या पसरलेला होता. अशा या दऱ्याखोऱ्यातील ग्रामीण मतदारसंघात भिवंडी तालुक्याचा समावेश होता. या मतदारसंघावर १९६७ पासून काँग्रेसचा वरचष्मा राहिला. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाच्या, तर अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रभावामुळे दोन वेळा भाजपच्या उमेदवाराला येथे यश मिळवता आले होते. 

या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार१९६७ - महाराज यशवंत मुकणे - काँग्रेस १९७१ - लक्ष्मण काकड्या दुमाडा - काँग्रेस१९७७ - लहानू कोम- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष१९८० - दामोदर शिंगडा- काँग्रेस १९८४ - दामोदर शिंगडा- काँग्रेस १९८९ -  दामोदर शिंगडा- काँग्रेस १९९१ - दामोदर शिंगडा- काँग्रेस १९९६ - चिंतामण वनगा - भाजप१९९८ - शंकर नम   - काँग्रेस१९९९ - चिंतामण वनगा  - भाजप२००४ - दामोदर शिंगडा  - काँग्रेस२००९ - सुरेश टावरे   - काँग्रेस२०१४ - कपिल पाटील -  भाजप२०१९ - कपिल पाटील - भाजप

५७ वर्षांत पहिल्यांदा...१९६७ ते २००४ अशा एकूण ११ लोकसभा निवडणुकांपैकी ८ वेळा काँग्रेस पक्षाचा उमेदवार भिवंडीतून विजयी झाला. आता ५७ वर्षांमध्ये पहिल्यांदा काँग्रेसची निशाणी येथे नसेल.

टॅग्स :thaneठाणेbhiwandi-pcभिवंडीcongressकाँग्रेस