भिवंडीत दारूसाठी पत्नीला जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:44 IST2021-09-27T04:44:26+5:302021-09-27T04:44:26+5:30

भिवंडी : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून तिला ठार ...

In Bhiwandi, his wife was burnt for alcohol | भिवंडीत दारूसाठी पत्नीला जाळले

भिवंडीत दारूसाठी पत्नीला जाळले

भिवंडी : दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळून तिला ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रुखसाना शेख (वय ३८) असे मृत महिलेचे नाव असून भिवंडीतील शांतीनगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पतीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. फिरोज शेख (वय ४५) असे आराेपीचे नाव आहे.

फिरोज आणि रुखसाना यांचा १८ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते शांतीनगर परिसरात राहत हाेते. फिराेज याला काही महिन्यांपासून दारूचे व्यसन जडले होते. त्यातच आरोपी फिरोज याने गुरुवारी पत्नीकडे दारूसाठी पैशांची मागणी केली होती. मात्र, त्या वेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या फिरोजने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. तिने तत्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करून तेथून पळ काढला. मात्र, ती आगीत हाेरपळल्यामुळे तिला नातेवाइकाच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान गुरुवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ताबडताेब शांतीनगर पोलिसांनी आराेपीला अटक केली.

Web Title: In Bhiwandi, his wife was burnt for alcohol