भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत आज मोठ्या घडामोडी घडल्या. भाजपच्या हातावर तुरी देत काँग्रेसने भाजप नगरसेवकांच्याच साथीने महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. महापौरपदी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी विजयी झाले असून उपमहापौरपदी काँग्रेसचे उमेदवार तारिक मोमीन हे बहुमताने विजयी झाले आहेत. पीठासीन अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
उपमहापौरपदासाठी त्रिकोणी लढत पाहायला मिळाली. यामध्ये तारिक मोमीन यांना सर्वाधिक ४३ मते मिळाली. शिंदे सेनेचे जावेद दळवी यांना २५ मते, तर भाजपचे सुहास नकाते यांना २१ मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाने भिवंडीत काँग्रेसने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
उपमहापौर निवडणुकीच्या सुरुवातीलाच कोणार्क विकास आघाडीचे मयुरेश पाटील यांना मोठा धक्का बसला. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका शबाना अंसारी यांनी मयुरेश पाटील यांच्या अर्जावर 'सूचक' आणि जावेद दळवी यांच्या अर्जावर 'अनुमोदक' म्हणून स्वाक्षरी केली होती. एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या उमेदवारांसाठी ही भूमिका घेतल्याने छाननी प्रक्रियेत मयुरेश पाटील यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यामुळे स्पर्धेत जावेद दळवी राहिले. भिवंडीत मोठ्या नाट्यमय घडामोडी! भाजपमधून फुटलेले नारायण चौधरी महापौर झाले; ४८ मते मिळविली
महापौरांपेक्षा उपमहापौरांना कमी मते मिळाली...महापौर पदाच्या निवडणुकीत नारायण चौधरी यांना एकूण ४८ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. भाजपमध्ये बंडखोरी करून त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मदतीने हा आकडा गाठला. दुसरीकडे, भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघी १६ मते मिळाली तर शिंदेंच्या उमेदवाराला २५ मते मिळाली होती. परंतू, उपमहापौर निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला ४३ मते मिळाली तर भाजपच्या उमेदवाराला २१ मते मिळाली. महापौरांना मिळालेली ५ मते पुन्हा भाजपकडे वळल्याचे समोर आले आहे.
अपक्ष उमेदवार नितेश एनकर यांची दांडीया निवडणुकीत आणखी एक नाट्यमय घडामोड म्हणजे अपक्ष उमेदवार नितेश एनकर यांची अनुपस्थिती. एनकर यांनी विलास पाटील (कोणार्क-शिंदे सेना गट) यांना पाठिंबा जाहीर केला होता आणि तशी नोंदणीही केली होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ते गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या भूमिकेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Web Summary : In Bhiwandi, Congress secured the Deputy Mayor's position with Tariq Momin's victory. Narayan Chaudhary, a BJP rebel, became Mayor. The election saw shifting alliances and unexpected absences, impacting the final results and power dynamics within the Bhiwandi-Nizampur Municipal Corporation.
Web Summary : भिवंडी में कांग्रेस के तारिक मोमिन उपमहापौर चुने गए। भाजपा के बागी नारायण चौधरी महापौर बने। चुनाव में बदलते गठबंधनों और अप्रत्याशित अनुपस्थितियों ने अंतिम परिणामों और भिवंडी-निजामपुर महानगरपालिका में शक्ति समीकरणों को प्रभावित किया।