भिवंडीत मोठ्या नाट्यमय घडामोडी! भाजपमधून फुटलेले नारायण चौधरी महापौर झाले; ४८ मते मिळविली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:40 IST2026-02-20T13:37:03+5:302026-02-20T13:40:14+5:30
Narayan Chaudhary Bhiwandi Mayor : भिवंडी महापौर निवडणुकीत नारायण चौधरी यांचा दणदणीत विजय. भाजपच्या बंडखोर उमेदवाराला ४८ मते, तर अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना १६ मते. विलास पाटील यांच्या पराभवाचे कारण काय? वाचा सविस्तर.

भिवंडीत मोठ्या नाट्यमय घडामोडी! भाजपमधून फुटलेले नारायण चौधरी महापौर झाले; ४८ मते मिळविली
भिवंडी: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार आणि ज्येष्ठ नेत्यांना मोठा धक्का देत बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांनी महापालिकेच्या सारीपटावर बाजी मारली आहे. नारायण चौधरी यांनी थेट भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून महापौरपदाची खुर्ची काबीज केली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या निवडणुकीत नारायण चौधरी यांना एकूण ४८ नगरसेवकांनी पाठिंबा दिला. भाजपमध्ये बंडखोरी करून त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या मदतीने हा आकडा गाठला. दुसरीकडे, भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना अवघी १६ मते मिळाली आहेत.
भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित केले होते. त्यांनी अर्ज भरल्यानंतर भाजपाने ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर करत अर्ज भरायला लावला. पक्षाच्या या अनपेक्षित निर्णयामुळे चौधरी गट प्रचंड नाराज झाला. चौधरी यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत ८ इतर नगरसेवकांसह भाजपपासून अंतर राखले होते. महापौरपदासाठी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना मतदान करण्याचे आदेश काँग्रेसने दिले होते. काँग्रेसकडे ३० मते होती तर राष्ट्रवादी (शरद पवार गट) १२ मते होती. या मतांच्या जोरावर नारायण चौधरी यांनी ४८ मते मिळवत भाजपसह शिंदे शिवसेनेलाही पराभवाचे पाणी पाजले आहे.
हातवर करून महापौर पदाची निवडणूक
सभागृहात हात वर करून मतदान घेण्यात आले सुरुवातीला नारायण चौधरी यांच्यासाठी मतदान झाले त्यांना ४८ मते मिळाली.
मयुरेश पाटील यांचा उपमहापौर पदाचा नामनिर्देशन पत्र अवैध
कोणार्कचे मयुरेश पाटील यांचे सूचक व शिंदेसेनेचे जावेद दळवी यांचे अनुमोदक म्हणून समाजवादी पक्षाच्या प्रभाग ८ क च्या नगरसेविका शबाना अंसारी या दोघांना सूचक व अनुमोदक राहिल्याने छाननी प्रक्रियेत मयुरेश पाटील यांचा उपमहापौर पदाचे नामनिर्देशन पत्र पीठासीन अधिकारी यांनी अवैध ठरवला.
विलास पाटील यांच्या पदरी निराशा
कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील, ज्यांच्याकडे या निवडणुकीत 'किंगमेकर' म्हणून पाहिले जात होते, त्यांना केवळ २५ मते मिळाली. न्यायालयीन कोठडीत असतानाही मतदानाची परवानगी मिळाल्यामुळे पाटील चर्चेत होते, मात्र सभागृहात पोहोचण्यासाठी झालेला विलंब झाल्याने थोडा गदारोळही झाला होता.