शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील पावणे अकरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात भिवंडी गुन्हे शाखेला यश; एकास अटक

By नितीन पंडित | Updated: February 1, 2024 17:55 IST

गिरीश सुनील तपासे वय ३५ वर्ष, रा. हाजी मलंग रोड नांदिवली कल्याण पूर्व असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भिवंडी : गोदामातील शटर तोडून गोदामात साठवलेला पीव्हीसी इलेक्ट्रिकल इन्सुलेशन असा दहा लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २६ जानेवारी रोजी दापोडा येथील गोदामात घडली होती. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात इस्मान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत होता. भिवंडी गुन्हे शाखेच्या तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने या घरफोडी प्रकरणातील आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून घरफोडी केलेला १० लाख ८० हजार रुपये किमतीचा सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखेला यश आले असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेने गुरुवारी दिली आहे. गिरीश सुनील तपासे वय ३५ वर्ष, रा. हाजी मलंग रोड नांदिवली कल्याण पूर्व असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.        तालुक्यातील दापोडे येथील जय श्रीराम कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलनात असलेल्या ग्लू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून १० लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरला होता.याप्रकरणी कंपनीतील सहकारी प्रद्युम्न प्रकाश जाधव यांनी २६ जानेवारी रोजी नारपोली पोलिस ठाण्यात गोदामातून घरफोडीची तक्रार दाखल केली होती.या घटनेचा समांतर तपास भिवंडी गुन्हे शाखा २ कडून करण्यात होता. गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाल्यानुसार तांत्रिक विश्लेषण करून गिरीश  तपासे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून तपास केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याचे कबूल दिली असून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दहा लाख ८० हजार रुपये किमतीचे पीव्हीसी इलेक्ट्रॉनिक इन्सुलेशन टेप रोलचे एकूण २४० बॉक्स असा मुद्देमाल हस्तगत करत आरोपीस अटक केली आहे.     सदरची कामगिरी गुन्हे शाखा भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी,धनराज केदार, सचिन ढोके, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र चौधरी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पाटील, पोलीस हवालदार साबीर शेख,किशोर थोरात, पो.ना. सचिन जाधव, पो.शि. सचिन सोनवणे, पो.शि. उमेश ठाकुर, रविंद्र साळुंखे यांनी केली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी