शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी : विलास पाटील यांना महापौर पदासाठी अर्ज भरण्यास न्यायालयाची परवानगी; शिंदेंच्या हालचालींना वेग

By नितीन पंडित | Updated: February 16, 2026 13:55 IST

- नितीन पंडित लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: माजी महापौर विलास पाटील यांना महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी भिवंडी न्यायालयाने ...

- नितीन पंडित

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: माजी महापौर विलास पाटील यांना महापौर व उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी भिवंडी न्यायालयाने सोमवारी अटी शर्थींवर परवानगी दिली आहे. कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने फसवणूक प्रकरणात अटक केली असून न्यायालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने नामांकन अर्ज भरण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी पाटील यांनी न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी होऊन न्यायालयाने अटी शर्थींवर पाटील यांचा अर्ज मंजूर केला आहे.

विलास पाटील यांनी कोणत्याही माध्यमांशी संवाद साधू नये, मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करू नये, कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी तसेच आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाबाहेर कोणाशीही संपर्क किंवा चर्चा करू नये. तसेच पोलीस ताफ्याचा खर्च देखील पाटील यांना करावा लागणार असल्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया विलास पाटील यांचे वकील ऍड.नारायण अय्यर यांनी दिली आहे. दरम्यान विलास पाटील यांना न्यायालयाने महापौर उपमहापौर पदासाठी अर्ज भरण्याची परवाणगी दिल्याने महापौर निवडणुकीसाठी शिंदे सेनेच्या हालचालींना वेग आला आहे. मात्र शिंदे सेना भाजपला बाजूला सारण्यात यशस्वी होणार, की भाजप सोबत जाणार हे महापौर निवडणुकीनंतरच जाहीर होणार आहे.

विलास पाटलांना अटक होताच शिंदेंचा प्लॅन चव्हाट्यावरशुक्रवारी रात्री माजी महापौर विलास पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने जमीन व्यवहार फसवणूक प्रकरणी अटक केली. पाटील यांना अटक करताच शिंदे सेनेने भिवंडी कल्याण रोड वरील नवी वस्ती भादवड परिसरातील दुकाने बंद केली. कोणार्क हे विलास पाटील शिंदे सेनेत नसतांनाही शिंदे सेनेने निषेध केला. यातच शिंदेंचा भाजपला बाजूला सारण्याचा प्लॅन चव्हाट्यावर आला.

शिंदे सेना महापौर व उपमहापौर अर्ज भरणार- प्रकाश पाटीलविलास पाटील यांना अटक झाल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली असून शिंदे सेनेचे नेते प्रकाश पाटील यांनी रविवारी मध्यरात्री शिंदे सेना महापौर व उपमहापौर पदाचे अर्ज दाखल करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिंदे सेना भाजप सोबत राहील की नाही हे महापौर पदाच्या निवडणुकी वेळेसच समजणार आहे.

भाजप एकत्र असून शिंदे सेना देखील भाजप सोबतच राहणार- रविकांत सावंतभाजप मध्ये सुमित पाटील आणि नारायण चौधरी यांच्या दोन गट पडले असल्याच्या अफवा काही दिवसांपासून उठल्या होत्या, मात्र रविवारी भाजपचे सर्व २२ नगरसेवक भाजप कार्यालयात एकत्र आले होते.त्यामुळे भाजपमध्ये कधीही दोन गट नव्हते.तसेच शिंदे सेनेने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले तरी २० तारखेला महापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळी शिंदे सेना महापौर पदासाठीचे अर्ज मागे घेईल आणि महापौर भाजपचाच होईल अशी प्रतिक्रिया भाजप शहराध्यक्ष रवीकांत सावंत यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bhiwandi: Court allows Vilas Patil to file mayoral nomination; Shinde's moves accelerate.

Web Summary : Vilas Patil secured court permission to file for Mayor. Shinde's Sena plans intensified post-Patil's arrest in a fraud case. BJP asserts unity, anticipating Shinde's support in the mayoral election.
टॅग्स :Bhiwandi Nizampur Municipal Corporation Electionभिवंडी-निजामपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६MayorमहापौरBJPभाजपाShiv Senaशिवसेना