शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

इमारतीच्या ढिगाऱ्यापर्यंत पाेहाेचताना दमछाक; बचाव पथक अडकले वाहतूक काेंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 08:00 IST

रस्त्यांवर वाहनांच्या रांगा, अंजुरफाटा, धामणकर नाका व कामतघर परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

भिवंडी : वळपाडा येथे तीन मजली इमारत कोसळल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्य करण्यासाठी निघालेल्या वाहनांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.  मानकोली अंजूर फाटा तसेच भिवंडी- ठाणे व मानकोली- ठाणे रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. या वाहतूककोंडीतून मार्ग काढताना बचाव पथकाला अक्षरश: कसरत करावी लागली. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील या वाहतूककोंडीचा परिणाम झाला होता. अंजुरफाटा, धामणकर नाका व कामतघर परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

इमारत दुर्घटनेबरोबरच भिवंडीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळपासून धामणकर नाका येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयात सुरू होती. त्यामुळे धामणकर नाका परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली. या वाहतूककोंडीचा फटका शहरातील अंतर्गत वाहतुकीला बसला. 

वाहतूक अतिशय संथ गतीने पुढे सरकत होती. दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराला तब्बल दीड ते दोन तास लागत होता. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवस सलग सुट्या असल्याने मुंबई- नाशिक महामार्गावर खासगी वाहनांची मोठी गर्दी होती. त्यामुळे खारेगाव टोलनाका ते वडपाडापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली.

बघ्यांनी केली मोठी गर्दी    एकीकडे घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाकडून अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे घटनास्थळी बघ्यांनी हळूहळू गर्दी करायला सुरुवात केली. कोणी त्या ठिकाणाचे फोटो तसेच शूटिंग काढत होते, तर कोणी व्हिडीओ कॉलवर होते. यामुळे वाहतूककोंडीबरोबरच बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. संध्याकाळी कामावरून सुटलेल्यांनीदेखील गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी तसेच स्थानिकांनी गर्दी करणाऱ्या या बघ्यांना हुसकावून लावले.

शेकडाे पोलिस तैनातपोलिस उपायुक्त परिमंडळ २ (भिवंडी सिटी) येथील पोलिस उपायुक्त, दोन सहायक पोलिस आयुक्त यांच्यासह सहा पोलिस ठाण्यांतील सहा वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्यासह पोलिस निरीक्षक आणि १०० च्या आसपास पोलिस कर्मचारी दुर्घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. त्याचबरोबर ठाणे शहरातही पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसही मानकोलीपासून तैनात करण्यात आले होते.

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटना