शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Bhiwandi: अभय योजनेतून मनपा तिजोरीत २५ कोटींची भर 

By नितीन पंडित | Updated: January 1, 2024 18:07 IST

Bhiwandi News: भिवंडी महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत.

- नितीन पंडितभिवंडी - भिवंडी महापालिकेने थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी राबविलेल्या अभय योजनेतून पालिकेच्या तिजोरीत सुमारे २५ कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्मचाऱ्यांनी राबविलेल्या या अभय योजना वसुली मोहिमेत वसुली पथकाने केलेल्या कामगिरी बाबत मनपा आयुक्तांनी समाधान व्यक्त केले असून अशाच प्रकारे कर वसुली करण्याचा सल्ला मनपा आयुक्त जय वैद्य यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

महापालिकेच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी डिसेंबर महिन्यात राबविलेल्या २३ दिवसांच्या मालमत्ता करावरील व्याजात सूट देणाऱ्या अभय योजना कालावधीत तब्बल १२ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल करण्यात पालिका कर्मचाऱ्यांना यश मिळाले असून एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ४८ कोटी ६८ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला असून २०२२ या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ३६ कोटी ६८ लाख रुपये जमा झाले होते.मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची रक्कम ही १२ कोटी रुपयांनी अधिक आहे.

पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी मालमत्ता कर वसुली साठी १६ ते ३१ ऑक्टोंबर दरम्यान राबविलेल्या अभय योजना पहिल्या टप्प्यात १२ कोटी ९४ लाख रुपयांची थकबाकी मालमत्ता कराची वसुली केली.त्यास मिळालेल्या यशा नंतर पालिका प्रशासनाने अभय योजना टप्पा दोन हा ९ ते ३१ डिसेंबर कालावधीत राबवला .या मध्ये १२कोटी ३५ लाख ६७ हजार रुपयांचा मालमत्ता कर गोळा केला आहे.अभय योजनेच्या दोन टप्प्यात मिळून २५कोटी २९ लाख ६७ हजार रुपयांचा महसूल पालिका तिजोरीत जमा झाला आहे.

झोपडपट्टी मालमत्ता धारकांकडून ४४ लाखाची विक्रमी वसुली,आयुक्तांनी केले अभिनंदनपालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने कर वसुली मोहीम जोरात सुरू असून सर्व अधिकारी कर्मचारी भूभाग लिपिक मालमत्ता कर वसुलीसाठी झटत आहेत.त्यामध्ये थकबाकी मालमत्ता धारकांना अभय योजनेचे महत्व पटवून देण्यात पालिका कर्मचारी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे झोपडपट्टी विभागातील थकीत मालमत्ता कर वसूल करण्यात यश मिळाले आहे. प्रभाग समिती क्रमांक दोन मधील झोपडपट्टी विभागामार्फत टेमघर विभाग येथील थकीत झोपडपट्टी मालमत्ता धारक यांच्याकडून मालमत्ता कर वसूल करण्याकरिता सहायक आयुक्त सुधीर गुरव,कार्यालयीन अधीक्षक अनिल आव्हाड,कर निरीक्षक गणेश कामडी,झोपडपट्टी विभाग लिपिक राजेंद्र गायकवाड, शरद भवार,वसंत भोईर व वसुली पथक यांच्या अतोनात प्रयत्नाने  केलेल्या कारवाईअंती रुपये ४४ लाख  ३१ हजार १०० रुपये वसूल करण्यात यशस्वी झाले आहेत.यापूर्वी प्रभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त फैसल तातली, कार्यालयीन अधीक्षक मिलिंद पळसुले यांनी याचा पाठपुरावा करून प्रकरण लोक न्यायालयात नेले होते. पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी कर्मचाऱ्यांनी चांगली वसुली केल्या बद्दल सहाय्यक आयुक्त व सर्व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडी