शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

भिवंडीत शेतकरी तयार : बुलेट ट्रेनचा विरोध मावळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 02:52 IST

भिवंडीत शेतकरी तयार : पुढील आठवड्यात शेतजमिनीची मोजणी

ठाणे : बुलेट ट्रेनसाठी भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर शेतजमीन लागणार आहे. तिच्या संयुक्त मोजणीस शेतकऱ्यांनी एकमुखी संमती दिल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यासाठी प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्या दालनात शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक बुधवारी पार पडली. त्यात शेतकºयांनी जमीनमोजणीस होकार दिल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

एक वर्षाहून अधिक कालावधी उलटला, तरी जिल्ह्यात बुलेट ट्रेनसाठी एक इंचही भूसंपादन झाले नाही. त्यास वेग यावा, यासाठी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली काही महिन्यांपासून शेतकरी व जिल्हा प्रशासनास हिरवा कंदील दाखवल्याने भिवंडी तालुक्यातील ६१ हेक्टर जमिनीची मोजणी होण्याचा मार्ग सुकर झाला. एकंदरीत, १३१ खातेदार शेतकºयांना पूर्ण विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही केली जाईल, असे डॉ. नळदकर यांनी सांगितले.

बुलेट ट्रेनसाठी लागणाºया शेतजमिनीसाठी अंजूर, भरोडी, हायवे दिवे येथील शेतकºयांनी विरोध दर्शवला होता. त्यावर तोडगा निघावा, यासाठी मोहन नळदकर व शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. भारद्वाज चौधरी, हिरा पाटील यांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा सुरू होती. शेतकºयांनी काही अटी कायम ठेवून संयुक्त जमीन मोजणीस होकार दिला. यामुळे १७ ते १९ जानेवारीदरम्यान अंजूर, भरोडी, हायवे दिवे येथील १२९ खातेधारक शेतकºयांच्या ६०.६४ हेक्टर जमिनीच्या मोजणीचे नियोजन निश्चित केले आहे. या बैठकीला हायस्पीड ट्रेनचे नायक, उपअधीक्षक भूमी अभिलेख प्रमोद ठुबे आदींची देखील उपस्थिती होती.या अटींना मान्यताबाधित शेतकºयांना मोबदला ठरवण्यासाठी नेमलेल्या शासकीय समितीत प्रकल्पग्रस्त शेतकºयांचा प्रतिनिधी नेमावा, बुलेट ट्रेन मार्गिकेला समांतर असलेल्या सर्व्हिस रोडला भरोडी ते म्हातार्डी, डोंबिवली यांना जोडणारा सर्व्हिस पूल द्यावा. तसेच प्रस्तावित बुलेट ट्रेनसाठी सुरई, भरोडी व अंजूर या भागांत कारशेड प्रस्तावित आहे. येथे स्थानिक भूमिपुत्रांना केवळ मजूर म्हणून नोकरी न देता त्यांना कौशल्यकामाची नोकरी द्यावी, या मागण्या मान्य केल्या आहेत.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनthaneठाणेFarmerशेतकरी