शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भातसा धरण प्रकल्प विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:54 IST

मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरण प्रकल्पांपैकी एक असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित आहे.

कसारा : मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरण प्रकल्पांपैकी एक असलेल्या शहापूर तालुक्यातील भातसा धरण क्षेत्रातील विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ५० वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न तातडीने सोडवावा या मागणीसाठी मंगळवारी, सिंचन भवन कार्यालय, ठाणे येथे भातसा धरण प्रकल्पविस्थापित समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष भाऊ महाळुंगे यांच्या नेतृत्वाखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जगदीश धोडी यांनी गेली ५० वर्षे रखडलेल्या विस्थापितांच्या पुनवर्सनाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी जातीने लक्ष घालून लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.या प्रकल्पासाठी १९६९ मध्ये खाजगी आणि वनजमीन भूसंपादनाची कार्यवाही सुरु करण्यात येऊन १९७३ मध्ये धरण बांधून पूर्ण करण्यात आले होते. यावेळी भूसंपादनांची प्रक्रि या सुरवातीस बृहन्मुंबई महानगरपालिका आणि त्यानंतर शासनाने केली. या बुडीत क्षेत्रासाठी ४४४.७३ हेक्टर खाजगी आणि २६२५ हेक्टर वनजमीन संपादित करण्यात आली होती.भातसा धरणासाठी बुडीत क्षेत्रातील पाल्हारी, पाचिवडे, घोडेपाऊल, वाकीचा पाडा, पळसपाडा अशी ३ गावे आणि २ पाडे यांची संपूर्ण जमीन तसेच घरे संपादित करण्यात आली होती. या प्रकल्पात एकूण ९७ कुटुंबे, आणि २८६ खातेदार यांसह एकूण ५७८ व्यक्ती बेघर झाल्या आहेत. मात्र, यापैकी फक्त ४७ लोकांनाच प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले देण्यात आले आहेत. १९७३ पासून सत्याग्रह, आंदोलने, मोर्चे, बैठकांद्वारे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याची मागणी प्रकल्पग्रस्त करीत आहेत. परंतु प्रकल्पग्रस्तांसाठी उदासीनता दाखवत असल्याने ‘ना घर का, ना घाट का’ अशी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे.प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना कायम आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलू. - जगदीश धोडी, उपाध्यक्ष, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, पालघर उपजिल्हाप्रमुख, शिवसेनाअनेक वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे; परंतु आमच्याकडे कोणी गांभीर्याने बघत नाही. आमच्या जमिनी घेऊन आम्हाला २ रु .चा कागद दिला की तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात. मात्र, गेली ५० वर्षे आमच्या पुनर्वसनाचा शासनाला विसर पडला आहे.- भाऊ बाबू महाळुंगे,अध्यक्ष, भातसा प्रकल्पग्रस्त समिती

टॅग्स :Damधरणwater transportजलवाहतूक