शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाईंदरच्या रहिवाशांचा रस्ता बळकावण्याचा घातला घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 23:58 IST

भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट वसाहतीमधील अंतर्गत रस्ता पालिकेच्या मालकीचा नसतानाही बिल्डरच्या फायद्यासाठी मात्र पोहोचरस्ता दाखवून बांधकाम मंजुरी देण्याचा नगररचना विभागाचा प्रकार समोर आला आहे.

मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या न्यू गोल्डन नेस्ट वसाहतीमधील अंतर्गत रस्ता पालिकेच्या मालकीचा नसतानाही बिल्डरच्या फायद्यासाठी मात्र पोहोचरस्ता दाखवून बांधकाम मंजुरी देण्याचा नगररचना विभागाचा प्रकार समोर आला आहे. बिल्डरसाठी रहिवाशांच्या मालकी हक्काचा रस्ताच बळकावण्याचा घाट पालिकेने घातल्याने आता नगरसेविकेनेही रहिवाशांसह आंदोलनाचा इशारा दिला आहे.भार्इंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट वसाहत असून फेज- ७, ८, ९ व १० मध्ये एकूण ५२ विंग आहेत. पाच हजार लोकवस्ती असलेल्या या वसाहतीचा अंतर्गत नऊ मीटरचा डांबरी रस्ता आहे. या वसाहतीचे बांधकाम २००२ मध्ये पूर्ण झाले असून येथे असलेली कुंपणभिंत १९९९ पासून असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.या वसाहतीच्या कुंपणभिंतीजवळ सर्व्हे क्र. ५६ च्या ९, १० मध्ये महापालिकेने २००८ मध्ये प्राथमिक, तर २०१० व नंतर २०१३ मध्ये वाणिज्य इमारतीच्या बांधकामास सुधारित परवानगी दिली होती. या इमारतीस चक्क न्यू गोल्डन नेस्ट वसाहतीतील अंतर्गत रस्त्याला पोहोचरस्ता दाखवून पालिकेने बांधकाम परवानगी दिली होती.ही इमारत बांधून पूर्ण झाली असून आता महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक श्रीकांत देशमुख यांनी न्यू गोल्डन नेस्ट रहिवाशांच्या असोसिएशनला गेल्या महिन्यात पत्र पाठवून अंतर्गत रस्ता नव्या इमारतीसाठी खुला करून देण्याचे कळवले आहे. त्यामध्ये या रस्त्याबाबत ४ डिसेंबरला सुनावणी झाल्याचे नमूद करतानाच संकुलातील नऊ मीटर वापराचा सार्वजनिक रस्ता असल्याने पोहोचरस्ता दर्शवल्याने परवानगी दिली, असे म्हटले आहे.पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तीन आॅगस्ट २०१३ रोजी तसे पत्र दिल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्याची प्रत नव्याने झालेल्या ओमसाई कमर्शियल कॉम्प्लेक्सचे प्रकाश राय व राजेश सिंग या विकासकांनाही त्यांनी दिली आहे. रहिवाशांचा पोहोचरस्ता अन्य विकासकास देण्यास सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे १९ सप्टेंबरला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी त्यांना पत्र देऊन या रस्त्याची पालिकेमार्फत देखभाल, दुरुस्ती व दिवाबत्ती केली जात असून वापर सार्वजनिक असल्याने सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता असल्याचा दाखला दिल्याचे म्हटले आहे.परंतु, विकासकांना पोहोचरस्ता गृहीत धरून बांधकाम परवानगी देण्याआधी रस्त्याची मालकी हस्तांतरित करून घेणे आवश्यक असल्याचे नगररचना विभागास कळवल्याचेही खांबित यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. नगररचना व बांधकाम विभागाच्या पत्रखेळात सापडलेल्या रहिवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.पालिकेने सात दिवसांत पोहोचरस्त्याचा प्रस्ताव रद्द न केल्यास मुख्यालयात रहिवाशांसह धरणे आंदोलनाचा इशारा शिवसेना नगरसेविका स्नेहा पांडे यांनी दिला आहे. नवीन इमारतीसाठीचा रस्ता हा पांचाळ इंडस्ट्रियल वसाहतीकडे असताना आमच्या वसाहतीतून पोहोचरस्ता परस्पर दाखवून रहिवाशांच्या मालकी हक्काचा रस्ताच हडपण्याचा डाव पालिकेने बिल्डरसोबत मिळून रचल्याचा आरोप पांडे यांनी केला.