भार्इंदर पालिका निवडणूक स्वबळावर

By Admin | Updated: February 26, 2017 02:33 IST2017-02-26T02:33:22+5:302017-02-26T02:33:22+5:30

मुंबईसह राज्यात मिळालेल्या यशानंतर मीरा भार्इंदर महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मीरा रोड येथील जिल्हा भाजपा कार्यालयात

Bharinder Palika Election on Election | भार्इंदर पालिका निवडणूक स्वबळावर

भार्इंदर पालिका निवडणूक स्वबळावर

मीरा रोड : मुंबईसह राज्यात मिळालेल्या यशानंतर मीरा भार्इंदर महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. मीरा रोड येथील जिल्हा भाजपा कार्यालयात गुरुवारी विजयोत्सव साजरा केला. दरम्यान, मीरा भार्इंदरमध्ये सध्या युतीची सत्ता आहे.
महापौर गीता जैन, आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, गटनेते शरद पाटील, ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील आदी उपस्थित होते. विजयाचा जल्लोष केला.
भाजपाच्या केंद्र व राज्यातील सरकारच्या पारदर्शक कामाची पोचपावती मतदारांनी दिली आहे. आॅगस्टमध्ये होणाऱ्या मीरा भार्इंदर पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे असे म्हात्रे म्हणाले. (प्रतिनिधी)

निवडणुकीपूर्वी अन्य नगरसेवक येणार
मीरा भार्इंदर पालिकेची निवडणुकही आम्ही स्वबळावर लढून भाजपाचा ७० पेक्षा अधिक जागांवर विजय होईल असा निर्धार आमदार नरेंद्र मेहता यांनी केला.
सध्या आमचे ३२ नगरसेवक आहेत. निवडणुकीपूर्वी आणखी ८ ते १० नगरसेवक आमच्या सोबत येतील असा दावा त्यांनी केला.

Web Title: Bharinder Palika Election on Election