शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान बनतेय मद्यपींचा अड्डा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 21:35 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

भार्इंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नेताजी सुभाषचंद्र बोस हे मैदान रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनत असल्याचा प्रकार तेथे पडलेल्या रिकाम्या बिअरच्या बाटल्या व खाद्यपदार्थावरुन मैदानात प्रभातफेरी करणाऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्याची तक्रार मैदानाची देखभाल करणाऱ्या कंत्राटदराकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 

पालिकेचे भार्इंदर पश्चिमेला नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान हे एकमेव भव्य मैदान अस्तित्वात असुन तेथे खेळण्यासाठी स्थानिक तसेच शहराबाहेरील खेळाडू दररोज येत असतात. या मैदानातून काही रणजी तर भारतीय क्रिकेट संघात क्रिकेटपटूंनी प्रवेश मिळविला आहे. त्यामुळे येथे क्रिकेट खेळणाऱ्यांसह फुटबॉल खेळणारे व योगा करण्यास येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तसेच या मैदानात प्रभातफेरीसाठी जॉगिंग ट्रॅक उपलब्ध असल्याने शहरातील अनेक नागरीक येथे सकाळी प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यामुळे हे मैदान नेहमी गजबजलेले ठरत असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने तीन पाळ्यांत प्रत्येकी दोन सुरक्षा रक्षक मैदानात नियुक्त केले आहेत. तसेच दिवसा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंत्राटदार देखील नियुक्त करण्यात आला आहे. मात्र रात्रीच्या वेळी या मैदानात परिसरातील काही मद्यपी मद्यपार्टीसाठी येत असल्याची माहिती अनेकदा मिळत असल्याने त्याकडे तैनात सुरक्षा रक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोप मैदानात प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. त्याच्या तक्रारी अनेकदा प्रशासनाकडे करण्यात आल्या असुन त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रभातफेरीसाठी येणाऱ्यांनी केला आहे. अखेर १४ फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास मद्यपींनी मैदानातील जॉगिंग ट्रॅकवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या व खाद्यपदार्थ तसेच सोडून तेथुन पोबारा केल्याचा प्रकार दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभातफेरी करणाय््राांच्या निदर्शनास आला. हा प्रकार मैदानात उपस्थित असलेले कंत्राटदाराचे कर्मचारी प्रकाश कांबळे यांच्या निदर्शनास आणून दिला असता त्याची माहिती पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळविल्याचे कांबळे यांनी सांगितले. तसेच मैदानात तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील समज दिल्याचे त्यांनी सांगितले. 

 

या मैदानात अनेक लहान मुले खेळण्यासाठी तर महिला व ज्येष्ठ नागरीक प्रभातफेरीसाठी येत असतात. त्यांच्यासमोर असे प्रकार उघड होऊ लागल्यास ते मैदानात येणार नाहीत. परिणामी मैदानाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता असल्याने पालिकेने असे प्रकार वेळीच रोखले पाहिजेत.

-  प्रभातफेरीसाठी येणारे ज्येष्ठ नागरीक अजित पाटील 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर