शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भार्इंदरच्या बेकायदा रविवार बाजारामुळे वाहतूक कोंडी सुरूच, महापालिकेचे अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 20:41 IST

मीरा रोड - भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणारा रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करून २ वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही.

मीरा रोड - भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणारा रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करून २ वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होऊन प्रवासी व नागरिकांना या बाजाराचा मोठा जाच होत आहे. त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर रस्त्याचे काम सुरू असल्याने दोन्ही रस्त्यांवरचा प्रवास म्हणजे डोकेदुखी ठरली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आदेशाला देखील पालिकेने हरताळ फासला आहे.४ डिसेंबर २०१५ रोजीच्या महासभेत त्यावेळी सत्ताधारी भाजपा व सोबत असलेल्या शिवसेना, बविआने भार्इंदर पोलीस ठाणे परिसरात पूर्वीपासून भरणा-या रविवार बाजारात केवळ स्थानिक मासळी विक्रेते, स्थानिक भाजीपाला व दैनंदिन वापरातले घरगुती खाद्यपदार्थ विक्रेत्यांनाच बसू देण्याचा ठराव केला होता. सुरुवातीला जेमतेम महिना - दोन महिने कारवाईचे नाटक झाले. त्यातही क्रॉस गार्डनपर्यंत व नंतर पुढे थेट शिवसेना गल्लीपर्यंत सर्रास कपडा, कटलरी आदी फेरीवाले सर्रास बसू लागले.वास्तविक भार्इंदर रेल्वे स्थानकापासून थेट उत्तन, चौक व गोराई पर्यंतच्या प्रवाशांसाठी हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे बेस्ट, एसटी, एमबीएमटी आदी बससेवांसह रिक्षा, दुचाकी , चारचाकी वाहनांची वर्दळ मोठी असते. आधीच या मार्गावर बेकायदा वाहनं उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी पाचवीलाच पुजलेली असते. त्यातच मुख्य रत्यावरील या बेकायदा फेरीवाल्यांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. शिवाय भुरट्या चोरया, पाकिटमारी व महिला - मुलींची छेड काढण्याचे प्रकार देखील घडत आहेत. फेरीवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात कचरा तसाच टाकला जातो. त्यात भर म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर देखील रस्त्याचे काम सुरू असल्याने काही भागात केवळ अर्धा रस्ताच वापरात आहे. त्यामुळे येथे देखील वाहतुकीची कोंडी होत असते.भार्इंदर पश्चिमेचे सदर दोन्ही मुख्य मार्गच फेरीवाले, बेकायदा पार्किंग, हातगाड्या यांनी व्यापले असुन त्यातच रवीवार बाजार व रस्त्याचे सुरु असलेल्या कामा मुळे सर्वामान्य नागरीक मेटाकुटीला आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच स्पष्ट आदेश देऊन देखील महापालिका व सत्ताधारी यांना त्याचं गाभीर्य राहिलेलं नाही. मुळात या भागातून बक्कळ बाजार वसुली ठेकेदाराच्या मार्फत केली जाते. सदर ठेकेदार हा सत्ताधा-यांच्या मर्जीतला असल्याने त्याचे आर्थिक हित जपण्यासाठी फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :hawkersफेरीवालेMira Bhayanderमीरा-भाईंदरmira roadमीरा रोड