अजित पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्षपदी भारत गंगोत्री
By सदानंद नाईक | Updated: April 9, 2024 19:05 IST2024-04-09T19:05:33+5:302024-04-09T19:05:51+5:30
गंगोत्री हे कलानी विरोधक म्हणून प्रसिद्ध असून अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत.

अजित पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्षपदी भारत गंगोत्री
उल्हासनगर : अजित पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी भारत गंगोत्री यांची नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धपत्रक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काढले. गंगोत्री हे कलानी विरोधक म्हणून प्रसिद्ध असून अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत.
उल्हासनगर अजित पवार गटाच्या शहरजिल्हाध्यक्ष पदी कोण? असा प्रश्न नेहमी विचारला जात होता. अखेर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीं प्रसिद्धपत्रक काढून भारत गंगोत्री यांच्या गळ्यात उल्हासनगर शहरजिल्हाध्यक्ष पदाची माळ टाकली आहे. जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या हस्ते शहरजिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र गंगोत्री यांना देण्यात आले. दरम्यान पप्पु कलानी यांच्यासह ओमी कलानी, पंचम कलानी समर्थकासह अजित पवार गटात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र गंगोत्रीच्या नियुक्तीने त्याला ब्रेक लागला असून कलानी कुटुंब शरद पवार गटात राहणार असल्याचे स्पष्ट झाले. भारत गंगोत्री हे पक्षाचे गटनेते पदी व महापालिका सभागृहनेते पदी राहिले असून कलानी विरोध म्हणून त्यांना ओळखले जाते.