शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

भाईंदरमध्ये इमारतीचा सज्जा पडून एक जण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 21:09 IST

आनंदनगर ए ही इमारत जुनी असून आज रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचा सज्जा खाली कोसळला.

मीरा रोड - भाईंदर पूर्वेच्या विमल डेरी मार्गावरील आनंद नगर ए या इमारतीचा सज्जा कोसळून एक जण जखमी झाला आहे. महापालिकेने सदर इमारत रिकामी करण्यास घेतली असून रहिवाशांना क्रीडा संकुलासमोरील सदनिकांमध्ये तात्पुरते स्थलांतरित केले आहे. 

आनंदनगर ए ही इमारत जुनी असून आज रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचा सज्जा खाली कोसळला.  यावेळी खाली असलेल्या मनोहर काशीलाल जैन (५५) जखमी झाले. त्यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच आमदार गीता जैन, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, स्थानिक नगरसेविका तारा घरत,  स्नेहा पांडे, अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश बोराडे यांच्यासह पूजा आमगावकर, पवन घरत आदींनी घटनास्थळी पाहणी केली. इमारत जुनी असल्याने पुन्हा कोणती दुर्घटना होऊन जीवित हानी होऊ नये या करता अग्निशमन दलाच्या जवानांनी सदर इमारत रिकामी करायला घेतली. 

 दरम्यान महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांची भेट घेऊन शिवसेना नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांचे पुनर्वसन पर्यायी जागेत करण्याची मागणी केली. पालिका क्रीडा संकुला समोरील एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील सदनिका महिन्याभरासाठी राहिवाश्याना राहण्यास उपलब्ध करून देण्यात आल्याचे प्रवीण पाटील म्हणाले. 

टॅग्स :mira roadमीरा रोडMira Bhayanderमीरा-भाईंदरthaneठाणेBuilding Collapseइमारत दुर्घटना