शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

भाग्यलक्ष्मीचे ११ मच्छीमार सुखरूप; दुर्घटनेनंतर ४३ तासांनी गाठला किनारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:06 IST

डहाणूच्या किनाऱ्यापासून ३० नॉटिकल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या भाग्यलक्ष्मी बोटीतील ११ मच्छीमार सुमारे त्रेचाळीस तासांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास किनाऱ्यावर सुखरुप परतले.

- अनिरुध्द पाटीलबोर्डी : डहाणूच्या किनाऱ्यापासून ३० नॉटिकल समुद्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या भाग्यलक्ष्मी बोटीतील ११ मच्छीमार सुमारे त्रेचाळीस तासांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास किनाºयावर सुखरुप परतले. त्यांना भेटण्यासाठी कुटुंबीय, मच्छीमार, स्थानिक नागरिक तसेच मत्स्य विभाग व तटरक्षक दलाचे अधिकारी आदींनी गर्दी केली होती.भानुदास गजानन तांडेल यांची ही मासेमारी बोट रविवारी १९ आॅगस्टच्या रात्री आठच्या सुमारास बुडाली. तसा वायरलेसद्वारे पहिला संदेश गुंगवाडा मच्छीमार सहकारी संस्थेचे चेअरमन अशोक अंभीरे यांना मिळाल्यावर त्यांची पवनसाई बोट, भूपेश मर्दे यांची तुळजाभवानी, गणेश तांडेल यांची गौरी तसेच जागृती, जमनाप्रसाद, प्रियदर्शनी या बोटी मदतीकरिता धावून गेल्या. तर दाजी तांडेल यांनी बंदरातून डिझेल आणि अन्य सामुग्री सोबत घेऊन महालक्ष्मी बोटीतून खोल समुद्रात कूच केली. तेथे पोहोचल्यावर या बोटींनी ११ खलाशांना आपापल्या बोटीवर सुखरूप घेतले. त्यानंतर फायबर कोटींगच्या दुर्घटनाग्रस्त बोटीला दोरखंडांनी त्यांच्या बोटींना बांधून किनाºयाकडे वाटचाल केली. ते सोमवारी सकाळपर्यंत किनारा गाठतील असा संदेश आणि खोल समुद्रातून येतानाचे फोटो व व्हीडिओ त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अन्य मच्छिमारांना पाठवले होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयासह संपूर्ण कोळीवाडा तसेच स्थानिक किनाºयावर आतुरतेने वाट पाहत होते. मात्र वारा आणि लाटांमुळे अपघातग्रस्त बोटीसह किनारा गाठतांना, त्यांना मंगळवारचे दुपारचे तीन वाजले. उपस्थितांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.मत्स्य विभाग व तटरक्षक दलाचे अधिकारी व कर्मचारीही या वेळी हजर होते. बोटीच्या केबिनचे नुकसान झाले असून जाळी वाहून गेली आहेत. हे खलाशी शारीरिक व मानिसक दृष्ट्या थकल्याने, बुधवारी जबाब व पंचनाम्याची प्रक्रि या पूर्ण होईल.हे बचावले सुखरुपबोटीचे मालक भानुदास तांडेलसह, जयवंत तांडेल, तुळशीदास तांडेल, नरेश दवणे, संजय काटेला, राहुल ठाकरे, निलेश वळवी, अजय वरळ, महेश मानकर, गणपत हाडळ, राध्या वळवी आदींचा सुखरूप पोहोचलेल्यात समावेश होता.

टॅग्स :Accidentअपघातpalgharपालघर