भदाणे यांच्या दालनाची झाडाझडती सुरूच, दुसऱ्या दिवशीही सापडल्या आणखी फाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:57 IST2018-06-01T00:57:59+5:302018-06-01T00:57:59+5:30
महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयाची झाडाझडती गुरूवारी दुसºया दिवशी सुरू होती.

भदाणे यांच्या दालनाची झाडाझडती सुरूच, दुसऱ्या दिवशीही सापडल्या आणखी फाइल
उल्हासनगर : महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कार्यालयाची झाडाझडती गुरूवारी दुसºया दिवशी सुरू होती. त्यात आणखी फाइल्स, कागदपत्रे सापडल्याची कबुली तपास अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याचे संकेत आयुक्त गणेश पाटील यांनी दिले.
सुट्टीवर जाताना दालनाची चावी पालिकेत जमा न करण्याच्या भदाणे यांच्या कृतीवर रिपाइंचे गटनेता भगवान भालेराव यांनी संशय व्यक्त करत त्यात काही फाइल्स दडवल्याचा आरोप करत चौकशीचे पत्र आयुक्त गणेश पाटील यांच्याकडे केल्यानंतर ती केबीन आधी सील करण्यात आली आणि बुधवारपासून त्याची झाडाझडती सुरू आहे. त्यात विविध विभागाच्या फाइल्स, सीडी, कोरे तसेच लाखोच्या रकमा भरलेले चेक, पालिका अधिकाºयांचा विदेश दौºयाचा फोटो अल्बम, आयुक्तांसह उपायुक्त व इतर अधिकाºयांचे रबरी स्टॅम्प, महत्त्वाचे कागदपत्र, राज्य सरकारची मोहोर असलेली उपायुक्तपदाची स्वत:ची ओळखपत्रे आदी कागदपत्रे त्यात मिळाली. तपास अधिकारी नेटके, नेमलेले पंच यांच्यासमक्ष गुरूवारी पुन्हा झाडाझडती घेण्यात आली, तेव्हा स्वत: भदाणे उपस्थित होते. या झडतीतही महत्वाच्या फाइल्स, कागदपत्रे मिळाल्याची माहिती नेटके यांनी दिली. दरम्यान, व्यापाºयांचे एक शिष्टमंडळ महापौर मीना आयलानी तसेच आयुक्त गणेश पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. महापालिकेसह शहराला बदनाम करणाºया भदाणे यांना पालिका सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करून तसे निवेदनही या शिष्टमंडळाने महापौरांना दिले. यावेळी उपमहापौर जीवन इदनानी, शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक राजेंद्र चौधरी, रिपाइंचे गटनेता भगवान भालेराव यांच्यासह काही नागरिक उपस्थित होते.