शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अस्वच्छता कराल तर खबरदार! कल्याणमध्ये स्वच्छतारक्षक तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 02:00 IST

तुम्हाला रस्त्यात थुंकण्याची, कचरा फेकण्याची सवय असेल तर खबरदार; अन्यथा तुमच्या हाती दंडाची पावती पडून १०० ते ५०० रुपयांना खिशाला फटका बसेल.

कल्याण : तुम्हाला रस्त्यात थुंकण्याची, कचरा फेकण्याची सवय असेल तर खबरदार; अन्यथा तुमच्या हाती दंडाची पावती पडून १०० ते ५०० रुपयांना खिशाला फटका बसेल. कल्याण-डोंबिवली शहरांचा स्वच्छता गुणांक वाढवण्यासाठी महापालिकेने १०० कंत्राटी स्वच्छतारक्षक नेमले आहेत. अस्वच्छता करणाऱ्यांना शुक्रवारपासून कल्याणमधील ‘ब’ आणि ‘क’ दंडवसुलीला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी पाच हजार ८०० रुपये वसुली झाली.कल्याण-डोंबिवली महापालिकेची शहरस्वच्छतेबाबत घसरगुंडी झाली आहे. शहराला गतवर्षीच्या सर्वेक्षणात चांगले गुण मिळाले; मात्र स्वच्छतेच्या बाबतीत शहर पहिल्या १० क्रमांकांत अव्वल राहावे, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधी व प्रशासनाने व्यक्त केली होती. डोेंबिवली हे सर्वाधिक अस्वच्छ शहर अशी टिप्पणी करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहर स्वच्छतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शहरात कचरा कुंडीत न टाकता कचरा रस्त्यावर फेकला जातो. जागोजागी थुंकून रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ केली जातात. हा गलिच्छ व्यवहार रोखण्यासाठी महापालिकेने स्वच्छतारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली होती. महापालिका हद्दीत १० प्रभागक्षेत्रे असून या १० प्रभागक्षेत्रांत १२२ प्रभाग विभागले आहेत. प्रत्येक प्रभागात १० स्वच्छतारक्षक नेमण्यात आले आहेत. कल्याण शहरात ५० आणि डोंबिवली शहरासाठी ५० रक्षक नेमले आहेत. कल्याणमध्ये ओरियन सेक्युरिला, तर डोंबिवलीत सिंग सिक्युरिटी या कंपनीला कंत्राट दिले आहे. दोन वर्षांचे हे कंत्राट असून दंडाच्या एकूण वसुलीपैकी ६७ टक्के रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल, तर उर्वरित रक्कम कंत्राट कंपन्यांना मिळेल. कंत्राटदाराला मिळणाºया रकमेतून रक्षकांचे पगार देण्यात येणार आहेत.कल्याण रेल्वेस्थानक परिसरात दंडवसुलीला सुरुवात होताच थुंकणाऱ्यांची भंबेरी उडाली. अनेकांना दंड आकारून त्याची पावती देण्यात आली. सायंकाळपर्यंत पाच हजार ८०० रुपये दंडवसुली झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.किती आकारला जाणार दंडसार्वजनिक ठिकाणी थुंकणे - १०० रुपयेउघड्यावरलघुशंका करणे- १०० रुपयेरस्त्यांवर घाण करणे- १५० रुपयेउघड्यावर शौच करणे- ५०० रुपये

टॅग्स :kalyanकल्याण