भामट्याकडून साडेबारा लाखांची फसवणूक

By Admin | Updated: March 25, 2017 01:25 IST2017-03-25T01:25:34+5:302017-03-25T01:25:34+5:30

दुकानाचा गाळा देण्याच्या नावाखाली साडे बारा लाखांची फसवणूक करणाऱ्या अशोक घागरे (६८) या भामट्याला नौपाडा पोलिसांनी

Betrayal of Rs | भामट्याकडून साडेबारा लाखांची फसवणूक

भामट्याकडून साडेबारा लाखांची फसवणूक

ठाणे : दुकानाचा गाळा देण्याच्या नावाखाली साडे बारा लाखांची फसवणूक करणाऱ्या अशोक घागरे (६८) या भामट्याला नौपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने कोल्हापूर येथून अटक केली आहे. त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
नौपाड्यातील रहिवासी गणपत वायकर (६९) यांनी दोन वर्षांपूर्वी घागरे याच्याकडून दुकानाचा गाळा घेण्यासाठी त्याला साडे बारा लाख रुपये धनादेशाद्वारे दिले होते. मात्र, कालांतराने घागरे याने गाळा दिला नाही आणि पैसेही परत न करता त्यांची साडे बारा लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी २०१४ मध्ये नौपाडा पोलीस ठाण्यात वायकर यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकारानंतर घागरे पसार झाला होता. अशा फसवणुकीत सराईत असल्यामुळे तो आपला मोबाइल क्रमांक आणि पत्ता वारंवार बदलून पोलिसांना चकमा देत होता. पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, उपनिरीक्षक अजय गंगावणे यांच्या पथकाने तांत्रिक कौशल्याचा वापर करून त्याचा कोल्हापूर येथील साळुंखेनगरातून शोध घेतला. चौकशीनंतर याप्रकरणी त्याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Betrayal of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.