‘निवृत्ती योजनेचा लाभ मिळावा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST2021-05-10T04:40:05+5:302021-05-10T04:40:05+5:30

---------------------------------------------- गरजूंना धान्य वाटप कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. यामुळे ...

'Benefit from retirement plan' | ‘निवृत्ती योजनेचा लाभ मिळावा’

‘निवृत्ती योजनेचा लाभ मिळावा’

----------------------------------------------

गरजूंना धान्य वाटप

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. यामुळे हातावर पोट असणाऱ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. अशा गरजूंना मदत करण्यासाठी कल्याणमधील सहयोग सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला असून, त्यांच्या वतीने अशोकनगर, नेतिवली टेकडी, पत्रीपूल या परिसरातील गरजूंना धान्याचे वाटप करण्यात आले. गहू, तांदूळ, तेल, तूरडाळ या स्वरूपात धान्याच्या ३५ किटचे वाटप करण्यात आल्याची माहिती विजय भोसले आणि भारत सटाळे यांनी दिली.

-------------------------------------------------

नर्सिंग कोर्स प्रमाणपत्र वितरण

कल्याण : श्री शिव साई प्रतिष्ठान संस्था आणि श्री शिव साई हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण हा मुद्दा घेऊन महिलांना मोफत नर्सिंग कोर्स २०१८-१९ पासून सुरू करण्यात आले आहेत. त्यातील पहिली बॅच पूर्ण झाली आहे. त्याचे प्रमाणपत्र वितरण शनिवारी करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रसेन सोनवळे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी डॉ. अविनाश नलावडे, डॉ. तुळशी पोटीयन, ईश्वर गव्हाणे, चंदन राजभर, भैरव जरे यांसह हॉस्पिटलमधील अन्य कर्मचारी उपस्थित होते.

---------------------------------------------------

फोटो आहे

Web Title: 'Benefit from retirement plan'