शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना एकाच अर्जाद्वारे राज्य, केंद्राच्या योजनांचा लाभ - माने

By सुरेश लोखंडे | Updated: November 11, 2023 20:19 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार आहे.  

ठाणे :

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना एकाच अर्जावर मिळणार आहे.   शेतक-यांनी या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, त्यातून शेतक-यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक डॉ.अंकुश माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शहापूर येथील कार्यक्रमात केले.

डोळखांब हेदवली येथील बबन हरणे यांच्या साई ऍग्रो नर्सरी येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात तमाने बोलत होते.भाजीपाल्याची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीला प्राधान्य देण्याचा सल्ला देत शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन जिल्हा कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी मार्गदर्शन केले. निर्यातक्षम भेंडी याविषयावर वास्तव ,बदलते हवामान या विषयावर शेतकऱ्यांना ग्रामीण शैलीने  कर्जत कृषी केंद्राचे संशोधक राजेंद्र सावळे यांनी मार्गदर्शन केले.बचत गट अथवा स्वयं सहाय्यतेने शेतीजन्य उत्पादनाकडे लक्ष द्यावे असा सल्ला विभागीय उपसंचालक डॉ.पाटील यांनी शेतकऱ्यांना दिला.या तालुक्यात भेंडी आणि काकडीचे उत्पादन दर्जेदार होत असले तरी विक्री व्यवस्थापनासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल असे तिसाई कृषी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश भांगरथ यांनी स्पष्ट केले.तर डॉ.राजेंद्र गाढवे यांनी मत्स्य शेतीबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.यावेळी कल्याण कृषी उपविभागीय अधिकारी सुधीर नयनवाड,तालुका कृषी अधिकारी अमोल अगवान,जि.प.सदस्य काशिनाथ पष्टे, प्रगतशील शेतकरी बबन हरणे,ऍड.प्रशांत घोडविंदे,महेंद्र भेरे,जनार्दन भगत यांसह मोठ्या संख्येने परिसरातील शेतकरी उपस्थित होते.