शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी घरांच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: June 23, 2016 03:05 IST

केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने बदलापूरमध्ये बांधण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतंर्गत ८०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

बदलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकाराने बदलापूरमध्ये बांधण्यात आलेल्या बीएसयूपी योजनेतंर्गत ८०० घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यातील अनेक घरांसाठी योजनेच्या लाभार्थांनी पालिकेकडे पैसे देखील भरले आहेत. मात्र तीन वर्ष झाले तरी या लाभार्थांना अद्याप घरे मिळालेली नाही. त्यामुळे या बीएसयूपी योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे.राज्यातील सर्वात कमी झोपडपट्टी असलेल्या शहरांपैकी एक शहर म्हणजे बदलापूर. बदलापूरमध्ये सर्वाधिक कमी झोपडपट्टी असल्याने हे शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी २०१० मध्ये केंद्र, राज्य सरकार आणि पालिका यांच्या मदतीने बीएसयूपी योजना राबविण्यात आली. या योजनेचे २०१२ मध्ये पहिल्या टप्प्याचे कामही पूर्ण झाले. तयार झालेली घरे मिळावी यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी ३५ ते ४५ हजारापर्यंत रक्कम पालिकेकडे भरली होती. आपल्या हक्काचे घर मिळेल या आशेवर त्यांनी कर्ज घेऊन ही रक्कम पालिकेकडे भरली. मात्र ही रक्कम भरुन तीन वर्ष झाले तरी या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर अद्याप मिळालेले नाही. बदलापूर एकमेव शहर आहे की जेथे बीएसयूपी योजनेचे काम पूर्ण होत असतानाही लाभार्थी मात्र घरांपासून वंचित राहिले आहे. लाभार्थी पालिकेत नियमीत पाठपुरावा करत असून त्यांच्या वाट्याला केवळ आश्वासनेच येत आहेत. बदलापूरमधील म्हाडा कॉलनी परिसरातील तयार घरांचे वाटप करण्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी घरांची सोडतही काढली होती. त्यानुसार त्या लाभार्थ्यांना घराचे वाटप करण्यात आले. मात्र घर मिळाले असले तरी त्याचा ताबा मिळाल्याचे पत्र अद्याप पालिकेने दिलेले नाही. तर सोनिवली येथे इमारती तयार असतानाही लाभार्थीना घरांचे वाटप केलेले नाही. (प्रतिनिधी)