शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

खवय्यांसाठी बेल्जियम चॉकलेट बर्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:44 IST

शुगर फ्री बर्फी मोठ्या प्रमाणात; गिफ्ट देण्यासाठी ड्रायफ्रुट्स मिठाईला मागणी

- प्रज्ञा म्हात्रेठाणे : ठाणेकरांचीदिवाळी यंदा आणखीन चवदार होणार आहे. मिठाईत नव्याने आलेल्या बेल्जियम चॉकलेट बर्फी आणि फॅन्सी काजूची चव खवय्यांना चाखायला मिळणार आहे. डाएट आणि मधुमेहग्रस्तांसाठी शुगर फ्री मिठाईसुद्धा यंदा भरपूर प्रमाणात आली आहे. घरगुती वापरासाठी मावा मिठाईला पसंती दिली जात असली, तरी गिफ्टसाठी ड्रायफ्रुट आणि काजू कतलीलाच प्राधान्य दिले जात आहे.दिवाळीचा गोडवा वाढवण्यासाठी रंगीबेरंगी, चविष्ट मिठाई खवय्यांसाठी आल्या आहेत. दुकानदारांनी खास दिवाळीच्या मिठाईचे स्टॉल्स दर्शनी भागांत लावले आहेत. काजू आणि ड्रायफ्रुट्स मिठाईचा यंदा ट्रेण्ड अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.ड्रायफ्रुट्सचे स्टफिंग असलेल्या फॅन्सी काजू मिठाईत मँगो, सीताफळ, काजू कनक, चंद्रमणी, पेरू, केशर डिलाइट, टोवेल नट्स हे नवीन १५ प्रकार यंदा आले आहेत. आप्तेष्टांना, सहकाऱ्यांना, मित्रमैत्रिणींना गिफ्ट्स देण्यासाठी काजू रोल, अंजीर रोल, खजूर रोल या मिठाईला पसंती दिली जात आहे, असे टीपटॉप प्लाझाचे मालक रोहितभाई शहा यांनी लोकमतला सांगितले. काजू कतलीचा दिवाळीनिमित्त खप वाढला आहे. कलाकंद म्हणून ओळखल्या जाणाºया मिल्क बर्फीला दिवाळीनिमित्त मागणी भरपूर असल्याने ती या दिवसांत मोठ्या प्रमाणात तयार केली जाते, असेही त्यांनी सांगितले. डाएट करणाºयांसाठी शुगर फ्री मिठाईत काजू रोल्स आणि काजू कतली हे दोन प्रकार आले आहेत.टनांवर होणार विक्री यंदा संपूर्ण ठाण्यात २५ टनच्या आसपास मिठाईची विक्री होण्याची शक्यता आहे. मिठाईच्या वाढत्या दरामुळे अर्धा किलो खरेदी करणारे पाव किलोवर येतील, असे मिठाईविक्रेत्यांनी सांगितले.गिफ्ट्स बॉक्स ठरत आहे ठाणेकरांचे आकर्षणचविष्ट मिठाईला आकर्षित गिफ्ट्स बॉक्सचा साज चढवण्यासाठी ज्वेलरी गिफ्ट्स बॉक्स आले आहेत. पाव किलो ते एक किलो मिठाईसाठी हे बॉक्स आहेत.मिठाई 15 टक्क्यांनी महागड्रायफ्रुट, दूध, डिझेल, वाहतूक यांचा खर्च वाढल्याने याचा परिणाम मिठाईच्या दरांवर झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा १५ टक्क्यांनी मिठाई महाग झाली आहे, असे शहा यांनी सांगितले.

 

टॅग्स :Diwaliदिवाळीthaneठाणे