स्वेटर्सच्या खरेदीला सुरूवात
By Admin | Updated: October 28, 2014 23:13 IST2014-10-28T23:13:29+5:302014-10-28T23:13:29+5:30
गुजरात आणि कोकण पट्टीत ‘निलोफर’ या सागरी वादळाच्या छायेमुळे कोकण पट्टीत ऑक्टोबरच्या अखेरीपासून गारवा जाणवू लागला आहे.

स्वेटर्सच्या खरेदीला सुरूवात
जान्हवी मोर्ये - ठाणो
गुजरात आणि कोकण पट्टीत ‘निलोफर’ या सागरी वादळाच्या छायेमुळे कोकण पट्टीत ऑक्टोबरच्या अखेरीपासून गारवा जाणवू लागला आहे. त्यात पावसाच्या
शिडकाव्यामुळे ही थंडी आता चांगलीच जाणवू लागली आहे. त्यामुळे कधी नव्हे ते लोकांनी उबदार स्वेटर्सच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. उपनगरात स्वेटरच्या विक्रीसाठी तिबेटीयन दाखल झाले असून लहान मुलांचे स्वेटर आणि ज्ॉकेटला मोठी मागणी असल्याचे या व्यापा:यांनी सांगितले.
डोंबिवली औद्योगिक निवासी परिसरात दाखल झालेला तिबेटीयन स्वेटर विक्रेता रिचेन तेजींग याने आपण 2क् वर्षापासून मुंबई उपनगरात स्वेटर विक्रीसाठी येत असल्याचे सांगितले. त्यांनी तीन महिन्यांसाठी आजदे गावात घर भाडय़ाने घेतले आहे. येथे व्यवसाय करताना इतक्या वर्षात कधीही त्रस झालेला नसल्याचे ते आवजरून सांगतात.
हा संपूर्ण माल नेपाळच्या काठमांडू आणि पंजाबच्या लुधियानामधून येतो. शेतीला जोडधंदा म्हणून तीन महिने स्वेटर विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचेही तेजिंग यांनी लोकमतला सांगितले. याठिकाणी व्यवसायाचा जम बसल्याने आपण येथे येत असल्याचेही ते म्हणाले.
तर बबन मालूसरे या विक्रेत्याने सांगितले की, स्वेटर विक्रीच्या धंद्यातून 5 ते सात लाखांची उलाढाल होते. नाशिकला जसे भव्य मार्केट आहे. तसे मार्केट मुंबई उपनगरात अथवा ठाणो जिल्ह्यात नाही. त्यामुळे जागेची अडचण असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वेटर्समध्येही व्हरायटी
यंदा बाजारात प्रथमच लाँग आणि कुडता स्वेटर आले आहेत. लॉग स्वेटर 65क् ते 8क्क् रूपयांपर्यत आहे. तर कुडता 75क् रूपयांना आहे. लहान मुलांसाठी विशेष मागणी असलेला बाबा सूट 25क् ते 4क्क् रूपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय लेस कोटी, मटरदाणा, स्वेट कोटी, ङिापर असे विविध प्रकारचे स्वेटर बाजारात आहेत. ङिापर स्वेटर 6क्क् ते 8क्क् रूपयांपर्यत, लेस कोटी स्वेटर 25क् रूपयांत उपलब्ध आहेत. शाल 225 ते 35क्, तर महिलांसाठी खास असलेली शाल 25क् ते 4क्क् रुपयांर्पयत आहे. तसेच ब्लँकेट, हातमोजे, पायमोजे, मुलांसाठी मंकी, राऊंड आणि साधी अशा वेगवेगळय़ा टोप्याही आहेत.