शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या परिवहन सेवेत ईटीएमची सुरुवात; पंचिंग मशिन हद्दपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2018 18:06 IST

ईटीएम (इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशिन)द्वारे बस तिकीट देण्याच्या प्रक्रियेस महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आल्याने पारंपरिक पंचिंग यामुळे हद्दपार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- राजू काळेभार्इंदर - मीरा-भाईंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेतील बसमध्ये ईटीएम (इलेक्ट्रॉनिक तिकिटिंग मशिन)द्वारे बस तिकीट देण्याच्या प्रक्रियेस महापौर डिंपल मेहता यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आल्याने पारंपरिक पंचिंग यामुळे हद्दपार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या पालिकेमार्फत कंत्राटी पद्धतीवर स्थानिक परिवहन सेवा चालविली जात आहे. एकूण ४८ पैकी सुमारे ३५ ते ४० बस एकूण १७ मार्गांवर चालविल्या जात आहेत. या बसमध्ये आजपर्यंत प्रवाशांना कागदी तिकीटे पंचिंग मशिनद्वारे दिली जात असली तरी त्याला तिलांजली देण्यासाठी प्रशासनाने वर्षभरापूर्वी कॅशलेस संकल्पना स्थानिक परिवहन विभागासाठी राबविण्यास सुरुवात केली. प्रवाशांना प्रवास करताना अनेकदा सुट्या पैशांअभावी वाहकासोबत वाद घालावा लागतो. त्यात काही वेळा वाहक सुट्या पैशांअभावी प्रवाशांना बसमधून मध्येच उतरवून दिले जाते.सुट्यांपैशाअभावी मार्गस्थ झालेल्या बसमध्ये वाद होऊ नये, तसेच प्रवाशांना त्याच कारणास्तव बसमधून उतरावे लागू नये, यासाठी विभागाने थेट मोबाईलद्वारेच तिकीट विक्रीस सुरुवात केली. रिडल या मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवाशांना कॅशलेस तिकिटे देण्यास सुरुवात झाली असली तरी ती वातानुकूलित मार्गांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली आहे.हे अ‍ॅप प्रवाशांना त्यांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यातील वॅलेटमध्ये पैसे भरावे लागते. उर्वरित मार्गांवरील साध्या बसमधून प्रवासासाठी वाहकांकडून पंचिंग मशिनद्वारे प्रवाशांना तिकिटे दिली जात होती. त्या मशिनला हद्दपार करून ईटीएम मशिनद्वारे तिकिट देण्याला रविवारपासून सर्वच बसमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. तत्पूर्वी त्याची सुरुवात महापौरांच्या हस्ते शनिवारी करण्यात आली. त्यावेळी आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यासह स्थायी समिती सभापती ध्रुवकिशोर पाटील, सभागृह नेता रोहिदास पाटील, परिवहन विभागाचे व्यवस्थापक विजयकुमार म्हसाळ, परिवहन उपव्यवस्थापक स्वाती देशपांडे आदी उपस्थित होते. त्यांनी ईटीएम तिकीट खरेदी करून काही अंतरावर प्रवास देखील केला. हे मशिन हाताळण्याचे प्रशिक्षण वाहकांना काही महिन्यांपासून देण्यास सुरुवात झाली होती. त्याचा मुहूर्त सतत तांत्रिक अडचणींत सापडल्याने अखेर त्याला शनिवारी सुरुवात करण्यात आली. या मशिनद्वारे वाहकाला पूर्वीच्या पंचिंग मशिनद्वारे देण्यात येणा-या तिकिटांचा हिशेब कार्यालयात मेमोद्वारे द्यावा लागत होता. त्याला ईटीएम मशिनमुळे बगल मिळाल्याने वाहकांना विक्री झालेल्या तिकिटांचा हिशेब या मशिनद्वारे अचूकपणे देता येणार आहे. याखेरीज तिकीट तपासणीसांना तिकिटांची तपासणी ईटीएमद्वारे त्वरित तपासणे सुलभ होणार असून, या प्रक्रियेत वेळेची मोठी बचत होणार असल्याने उत्पन्नवाढीत भर पडणार असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. यासाठी पालिकेने एकूण ६० ईटीएम स्वाईप मशिन खरेदी केल्या आहेत. या मशिनला रिडल हा मोबाईल अ‍ॅप जोडून पूर्णता कॅशलेस तिकीट विक्री करण्याचा प्रशासनाचा मानस असल्याचे आयुक्तांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर