झोपाळ्याचा फास; चिमुरडीचा मृत्यू
By Admin | Updated: July 5, 2016 01:37 IST2016-07-05T01:37:25+5:302016-07-05T01:37:25+5:30
झोपाळ्यावर खेळताना त्याच्या दोरीत मान अडकून फास लागल्याने दिया सरोदे (वय ८) हिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी ४च्या सुमारास डोंबिवली गणेशनगर

झोपाळ्याचा फास; चिमुरडीचा मृत्यू
डोंबिवली : झोपाळ्यावर खेळताना त्याच्या दोरीत मान अडकून फास लागल्याने दिया सरोदे (वय ८) हिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी ४च्या सुमारास डोंबिवली गणेशनगर येथील पांडुरंग कॉम्प्लेक्समध्ये घडली.
सरोदे दाम्पत्याचा टेरेस फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे. रविवारी दुपारी जेवणानंतर दिया टेरेसवरील झोपाळ्यावर गेली. बराच वेळ झाला, तरी दिया परतली नाही म्हणून आई (श्रुती) तिला बोलवण्यासाठी गेली, तेव्हा तिला दियाची मान झोपाळ्याच्या दोरीत अडकून तिला गळफास लागल्याचे दिसले. यानंतर तत्काळ दियाला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारांसाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रु ग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. (प्रतिनिधी)