शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसासह पत्नीला मारहाण; भाजप कार्यकर्त्यासह आठ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 13:53 IST

बोरिवली पोलिस ठाण्यात हवालदार असलेले प्रदीपकुमार बाबर हे कुटुंबासह मीरा रोडच्या हाटकेश भागातील राज एक्झॉटिका या इमारतीत राहतात.

लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा रोडमध्ये एका सोसायटीत राहणाऱ्या भाजप कार्यकर्ता व त्याच्या कुटुंबीयाने मुंबई पोलिस दलातील पोलिसासह त्याच्या पत्नीस मारहाण केली. स्वत:ला बाहुबली म्हणवून घेणाऱ्या अमित सिंह या भाजप कार्यकर्त्यासह एकूण आठ जणांवर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

बोरिवली पोलिस ठाण्यात हवालदार असलेले प्रदीपकुमार बाबर हे कुटुंबासह मीरा रोडच्या हाटकेश भागातील राज एक्झॉटिका या इमारतीत राहतात. बुधवार, १५ नोव्हेंबरच्या रात्री नऊच्या सुमारास बाबर हे ड्यूटी करून घरी जाण्यासाठी इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आले असता अमित सिंह हा त्यांच्याकडे रागाने पाहू लागला. रागाने का पाहतो, असे विचारले असता अमित याने धमकी देत भाऊ अभिजित उर्फ घोडा याला कॉल करून येण्यास सांगितले. काही वेळातच अभिजितसह त्याचे वडील सुरेंद्र, आई सरिता, पत्नी कोमल, सोनू अभिजित सिंह, सुरेंद्र यांचा चालक व एक अनोळखी असे धावून आले आणि मारहाण सुरू केली.

रहिवासी करताहेत कारवाईची मागणीरहिवाशांच्या सांगण्यानुसार, १८० सदनिका असलेल्या या सोसायटीत गेल्या चार वर्षांपासून सिंह कुटुंबीयांनी दादागिरी चालवली आहे. सुरेंद्र सिंह हे सोसायटीचे अध्यक्ष असताना मनमानी व गैरकारभाराबद्दल रहिवाशांनी गृहनिर्माण संस्था निबंधक यांच्याकडे तक्रार केल्या. त्यामुळे सुरेंद्र यांना पदावरून हटवले. गैरप्रकाराबद्दल कारवाईची मागणी रहिवासी करीत आहेत.

स्वत:ला बाहुबली म्हणत फलकबाजीअमित सिंह याने स्वत:ला बाहुबली म्हणवत भारतीय जनता पार्टीचा फलक सोसायटीच्या आवारात लावला आहे. राजकीय पक्षाचा फलक काढून टाकण्याचे सांगून पण सिंह सोसायटीला जुमानत नाही. अशा कारणांमुळे रहिवाशांना जाणीवपूर्वक टोमणे, दादागिरी, मारहाण करणे आदी प्रकार अमित सिंह व कुटुंबीयांकडून होतात, असे रहिवाशांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस