शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाड यांच्या बंगल्यावरील मारहाण: कोरोनाग्रस्त आरोपींच्या संपर्कातील ठाण्याच्या २२ पोलिसांचा ‘हायरिस्क’मध्ये समावेश

By जितेंद्र कालेकर | Updated: April 15, 2020 09:25 IST

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्याच्या आवारात फेसबुकवरील वादग्रस्त पोस्ट केल्यावरुन एका अभियंत्याला मारहाणीचा प्रकार घडला होता. यामध्ये सहा आरोपींना अटक झाली होती. या सहापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील तब्बल २२ पोलिसांचा हायरिस्कमध्ये समावेश झाला असून त्यांना आता विलगीकरणामध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ठळक मुद्दे वर्तकनगरचे २२ पोलीस कर्मचारी विलगीकरणातठाणे शहर आयुक्तालयात ५१ पोलिसांवर विलगीकरणात राहण्याची आफतपोलिसांवर कामाचा ताण वाढला

जितेंद्र कालेकरठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील बंगल्यावर एका अभियंत्याला मारहाण प्रकरणात अटकेत असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या सुमारे २२ पोलीस कर्मचाऱ्यांनाही विलगीकरणात ठेवले आहे. आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात विलगीकरणातील पोलिसांची संख्या ५१ वर पोहचली आहे.आव्हाड यांच्या ठाण्यातील विवियाना मॉलसमोरील बंगल्याच्या आवारात ५ एप्रिल रोजी रात्री अनंत करमुसे या अभियंत्याला मारहाणीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्याने वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आधी पाच जणांना तर नंतर एकाला अशा सहा जणांना अटक केली. या सहापैकी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. मुंब्रा भागातील काही जणांना कोरोनाची लागण झाली, त्याचवेळी त्याभागात आव्हाड यांच्यासमवेत गेलेल्या सर्वांची कोरोनाची तपासणी आरोग्य विभागाने केली होती. त्यामध्ये आव्हाड यांच्यासमवेत असलेल्या दोन पोलीस सुरक्षा रक्षकांसह १४ जणांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याच १४ जणांमध्ये वरील प्रकरणातील दोन आरोपींचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांचे जबाब नोंदविणे, त्यांना न्यायालयात नेणे, त्यांची वैद्यकीय तपासणी करणे, घटनास्थळाचा पंचनामा करणे, स्कॉर्पिओ आणि त्यांनी वापरलेल्या लाकडी काठया जप्त करणे या संपूर्ण प्रक्रीयेमध्ये वर्तकनगर पोलीस ठाण्याचे २२ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. दोन आरोपींची तपासणी कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यांच्या चौकशीमध्ये असलेले हे सर्वच पोलीस त्यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे पोलिसांमध्येही भीतीचे वातावरण आहे.* दरम्यान, वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या या सर्व २२ पोलीस कर्मचाºयांची मंगळवारी कॅडबरी उड्डाण पूलाखाली असलेल्या केंद्रामध्ये कोरोनाची तपासणी करण्यात आली. या सर्वांनाच आता विलगीकरणात ठेवले आहे. त्यापूर्वी, मुंब्रा पोलीस ठाण्यातील ३२ पोलीस कर्मचा-यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिघांचे अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आले. त्यांना विलगीकरण कक्षातून थेट रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामुळे वर्तकनगरचे २२ आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे २९ अशा ५१ पोलिसांवर विलगीकरणात राहण्याची आफत ओढवली आहे. यातील काहींना घरात तर काहींना विलगीकरण केंद्रामध्येच विलग रहावे लागणार आहे. त्यामुळे नाक्यावरील बंदोबस्ताच्या ठिकाणी कर्मचाºयांची नियुक्ती कशी करायची असाही प्रश्न आता वरिष्ठ पोलीस अधिका-यांसमोर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस