मुलगी पुरवली नसल्याने मॅनेजरला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:41 IST2021-04-04T04:41:52+5:302021-04-04T04:41:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहाड फाटक परिसरातील दीक्षा लॉजमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजता जाऊन मुलगी देण्याची मागणी करणाऱ्यांना ...

मुलगी पुरवली नसल्याने मॅनेजरला मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहाड फाटक परिसरातील दीक्षा लॉजमध्ये शुक्रवारी दुपारी १२ वाजता जाऊन मुलगी देण्याची मागणी करणाऱ्यांना ती न दिल्याच्या रागातून, नितीन बोथ, कमल बोथ व रोहित गायकवाड यांनी लॉज मॅनेजर सतीश अमीन याला मारहाण केली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ झाली असून, पोलीस हैराण झाले आहेत. कॅम्प नं.-१ शहाड फाटक परिसरात दीक्षा नावाचे लॉज आहे. शुक्रवारी दुपारी १२ वाजेदरम्यान परिसरातील नितीन बोथ, कमल बोथ व रोहित गायकवाड, असे तिघे तेथे गेले व त्यांनी आम्हाला मुलगी पुरव, अशी मागणी लॉजचा मॅनेजर सतीश अमीन यांच्याकडे केली. त्यांनी येथे असे अनैतिक धंदे चालत नाहीत, असे सांगितले. याचा राग आल्याने तिघांनी लोखंडी रॉड, फायटरने मॅनेजर अमीन यांच्यासह त्यांच्या भावाला लॉज व रस्त्यावर जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या लॉज मॅनेजर अमीन यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
..............
वाचली