‘पाकिस्तानचा बीमोड करा’

By Admin | Updated: July 17, 2017 01:06 IST2017-07-17T01:06:15+5:302017-07-17T01:06:15+5:30

दहशतवादी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत असून दहशतवाद्यांसह पाकिस्तानचा बीमोड करा अशी मागणी रविवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली.

'Bead Pakistan' | ‘पाकिस्तानचा बीमोड करा’

‘पाकिस्तानचा बीमोड करा’

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : दहशतवादी कारवाया पाकिस्तान पुरस्कृत असून दहशतवाद्यांसह पाकिस्तानचा बीमोड करा अशी मागणी रविवारी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
अमरनाथ यात्रेवरील हल्ला आणि पश्चिम बंगालमधील हिंदूंवर धर्मांधांकडून सातत्याने होणारे हल्ले याच्या निषेधार्थ कल्याण पश्चिमेत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, हिंदू राष्ट्र सेना, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती या संघटनांसह भाजपा, शिवसेनेचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. अमरनाथ यात्रेसाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही यात्रेकरूंवर दहशतवादी हल्ला झाला. दोन वर्षापूर्वी दहशतवाद्यांनी आक्रमण करून लंगरची जाळपोळ केली होती. यात २४ जण जखमी झाले होते. या घटनांच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला टिळक चौकातून प्रारंभ झाला. तर शंकरराव चौकात या मोर्चाचे सभेत रूपांतर होऊन त्याची सांगता झाली.

Web Title: 'Bead Pakistan'