शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

बोगस ठरावाच्या आधारे ठाण्यातील सोसायटीचा वाढीव एफएसआय विकासकाला विकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:06 IST

सदस्यांच्या बोगस सह्या करून सोसायटीचा एफएसआय विकासकांना विकल्याप्रकरणी सात आरोपींविरूद्ध ठाण्यातील कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देसदस्यांच्या खोट्या सह्या३२ कोटींची फसवणूकगुन्हा दाखल

ठाणे : बनावट ठरावाच्या आधारे वाढीव एफएसआय विकासकाला विकून ३२ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सोसायटीच्या पदाधिकाºयांसह विकासकाविरूद्ध कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.घोडबंदर रोडवरील पुरूषोत्तम प्लाझा को-आॅपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये दोन वर्षांपूर्वी हा प्रकार घडला. सोसायटीचे कोषागार रविंद्र थिटे यांनी याप्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोईर, सचिव सौ. राणी देसाई, जय डेव्हलपर्सचे भागीदार कमलेश राणावत आणि जितेंद्र देढिया, मे. शहा अ‍ॅण्ड देढिया एन्टरप्रायजेसचे गौरव देढिया, पियुष शहा आणि गौरव कन्स्ट्रक्शनचे भागीदार धर्मेन्द्र जिंदाल यांच्याविरूद्ध तक्रार दिली होती. १४ एप्रिल २0१६ रोजी सोसायटीची कोणतीही बैठक झालेली नसताना, सोसायटीचे अध्यक्ष मोहन भोईर आणि सचिव राणी देसाई यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यासाठी सोसायटीच्या सदस्यांच्या बनावट सह्या केल्या. या बनावट ठरावाच्या आधारे आरोपींनी विकासक आणि भागिदारांना कन्फर्मेशन डिड करण्याचे अधिकार प्रदान केले. आरोपींनी कन्फर्मेशन डिडची नोंदणी करून महापालिकेमध्ये कागदपत्रे सादर केली. त्यानंतर आवश्यक असलेली इतर कागदपत्रे आरोपींनी तयार केली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी सोसायटीच्या गार्डनचा एफएसआय बळकावला. रेडिरेकनरनुसार या जागेची किंमत २२ कोटी रुपये तर बाजारभावानुसार ३२ कोटी रुपये असल्याचा आरोप थिटे यांनी केला आहे. सोसायटीच्या आरोपी पदाधिकाºयांनी या व्यवहारामध्ये इतर आरोपींकडून ५५ लाख रुपये घेतल्याचा आरोपही थिटे यांनी केला आहे. तक्रारदाराने यासंदर्भात ठाणे न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. आरोपींनी दखलपात्र गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी निरिक्षण प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी आर.टी. इंगळे यांनी नोंदविले. न्यायालयाच्या आदेशानुसार कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरूद्ध २२ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.सोसायटीचे सभासद नसलेल्यांच्याही ठरावावर सह्यापुरूषोत्तम प्लाझा सोसायटीच्या सभासदांनी विकासकाच्या फायद्यासाठी घेतलेल्या ठरावावर बोगस सह्या केल्याचा आरोप तक्रारदार रविंद्र थिटे यांनी केला. त्यांचा दावा न्यायालयाने ग्राह्य धरला. सोसायटीच्या ज्या सदस्यांच्या बोगस सह्या ठरावावर करण्यात आल्या, त्यांनी त्या सह्या त्यांच्या नसल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केले. सोसायटीचे भागीदार नसलेल्या काही लोकांच्या सह्यादेखील ठरावावर आहेत. त्यांचे सोसायटीमध्ये एकही दुकान किंवा फ्लॅट नसून, आरोपींनी घोटाळा करण्यासाठी त्यांच्या सह्यांचा वापर केल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदविले.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस