गरिबांना पालिकेचा आधार

By Admin | Updated: July 14, 2014 02:23 IST2014-07-14T02:23:35+5:302014-07-14T02:23:35+5:30

खाजगी रुग्णालयातील मोठ्या शस्त्रक्रियांचा खर्च गरीब रुग्णांना परवडणारा नसतो़ त्यातही काही जण आपल्या आप्तेष्टांसाठी कर्ज काढतात,

The base of the poor | गरिबांना पालिकेचा आधार

गरिबांना पालिकेचा आधार

शेफाली परब-पंडित- मुंबई
खाजगी रुग्णालयातील मोठ्या शस्त्रक्रियांचा खर्च गरीब रुग्णांना परवडणारा नसतो़ त्यातही काही जण आपल्या आप्तेष्टांसाठी कर्ज काढतात, तर बहुतांशी गरीब रुग्णांचा पैशाअभावी बळी जातो़ अशा रुग्णांसाठी पालिकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला असून, यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार आहे़ या प्रस्तावाला विधी समितीत मंजुरी दिली आहे़
केईएम, नायर आणि सायन या तीन प्रमुख तसेच १६ उपनगरीय रुग्णालयांमध्ये लाखो गरीब रुग्णांना दरवर्षी मोफत उपचार मिळत असतो़ मात्र हृदयविकार, कर्करोग, अवयव प्रत्यारोपण, गुडघे बदलणे अशा शस्त्रक्रियांसाठी मात्र रुग्णांना खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते़ परंतु हे महागडे उपचार व शस्त्रक्रियेचा खर्च गरिबांच्या आवाक्याबाहेरचा असतो़
अशा गरजू रुग्णांच्या उपचारासाठी पालिकेने निधी राखून ठेवावा, अशी ठरावाची सूचना पालिका महासभेत मंजूर करण्यात आली होती़ यावर प्रशासनाने वर्षभरानंतर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे़ त्यानुसार गरीब व अत्यंत गरजू रुग्णांची शस्त्रक्रिया व उपचारासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात येणार असल्याचे विधी समितीचे अध्यक्ष ज्ञानमूर्ती शर्मा यांनी सांगितले़

Web Title: The base of the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.