कल्याण : बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार का दिला ? याचे उत्तर काँग्रेसचे नेते देतील. महाराष्ट्रात अशी परंपरा राहिली आहे की अशा परिस्थितीत कोणताही पक्ष उमेदवार देत नाही", असे विधान कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. इतकेच नाही तर एसआयआरमध्ये मॅपिंग व्यवस्थीत व्हावी. एक ही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी काळजी घेतली जावी अशी सूचना खासदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिली आहे.
पक्ष संघटनात्मक बांधणी आणि एसआआर यासाठी ही बैठक बुधवारीन आयोजित केली गेली होती. शिवसेना शिंदे गटाकडून संघटनात्मक बांधणीकरीता लोकसभा मतदार संघ निहाय आढावा बैठका सुरु करण्यात आल्या आहेत.
खासदार शिंदे यांनी खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र फाटक यांच्या उपस्थितीत भिवंडी लोकसभा मतदार संघाची आढावा बैठक कल्याणमध्ये घेतली. त्याचबरोबर एसआयआर संदर्भात मॅपिंग करणे बंधनकारक आहे. याविषयी माहिती या बैठकीत देण्यात आली.
मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये त्याने फॅमिली मॅपिंग केले पाहिजे. याची काळजी घ्यावी. तसेच कार्यकर्त्यांनी मतदार संघात जाऊन प्रत्येक मतदाराला याचे महत्व पटवून दिले पाहिजे असे आवाहन खासदार शिंदे यांनी केले आहे. या बैठकीस शिवसेना शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Web Summary : MP Shrikant Shinde criticized Congress for fielding a candidate against Sunetra Pawar in Baramati, questioning their motives. He emphasized voter mapping to ensure no one is disenfranchised, addressing party workers in a meeting focused on organizational structure.
Web Summary : सांसद श्रीकांत शिंदे ने बारामती में सुनेत्रा पवार के खिलाफ उम्मीदवार उतारने पर कांग्रेस की आलोचना की, उनके इरादों पर सवाल उठाया। उन्होंने संगठनात्मक ढांचे पर केंद्रित एक बैठक में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए, यह सुनिश्चित करने के लिए वोटर मैपिंग पर जोर दिया कि कोई भी वंचित न रहे।