शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोटच्या ४ महिन्यांच्या बाळाच्या विक्रीचा प्रयत्न करणा-या बारबाला आई, बापासह बालगृहाच्या संचालिकेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 22:21 IST

पोटच्या ४ महिन्यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या बारबाला आई-बापासह बालसुधारगृह चालवणा-या महिलेस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे.

मीरा रोड - पोटच्या ४ महिन्यांच्या मुलाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करणा-या बारबाला आई-बापासह बालसुधारगृह चालवणा-या महिलेस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. तीनही आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.भार्इंदर पूर्वेला राहणारा पती तर नालासोपारा येथे राहणारी त्याची पत्नी असे दोघे मिळून एका बालकाला ६ लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत खातरजमा करून कारवाईचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , मानवी वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक संजय बांगर व पोलीस पथकाने तपास सुरू केला.चौकशीत सदर ४ महिन्याचे बालक हे पूर्वेला राहणारा इसम व नालासोपारा येथे राहणारी त्याची बारबाला पत्नी यांचे असून सदरचे बालक त्यांना नको होता. शिवाय पैशांची पण गरज होती. म्हणून बारबाला आईने बहिणीच्या परिचीत उदयपूर येथील राधिका चाईल्ड केअर या नावाने बालगृह चालवणा-या महिलेशी संपर्क साधला होता. दोघा दाम्पत्याने त्यांच्या ४ महिन्यांचा मुलगा विकण्यासाठी बालगृह चालवणा-या महिलेच्या माध्यमातून काहींशी संपर्क साधणे चालवले होते. पोलिसांनी बनावट गि-हाईकामार्फत संपर्क साधून मुलाची खरेदी ६ लाख रुपयात नक्की केले. मीरा रोडच्या सिल्वरपार्कजवळील व्हेजीस या हॉटेलात भेटायचे ठरवले. तेथेच सापळा रचून पोलिसांनी मुलाची बारबाला आई व बापासह बालगृहाच्या संचालिकेस अटक केली.चौकशीत पोलिसांना सदर बारबालेची आणखी एक अडीच वर्षांची मुलगी व १० वर्षांचा मुलगा असल्याचे आढळले. या दोन्ही मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेऊन बालगृहात ठेवले आहे. मीरा रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अटकेतल्या तिघाही आरोपींना ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर