शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी बारना आता आठवड्याची नोटीस, पुन्हा बांधकाम केलेल्यांवर तीन दिवसात कारवाई, ठाण्याच्या आयुक्तांचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 03:56 IST

अग्नीशमन सुरक्षेचे नियम न पाळलेल्या बार-हॉटेलवर कारवाईबाबत ठाणे पालिकेने पावले उचलली असून त्यांना सात दिवसांच्या नोटिसा पाठवल्या आहेत.

ठाणे : अग्नीशमन सुरक्षेचे नियम न पाळलेल्या बार-हॉटेलवर कारवाईबाबत ठाणे पालिकेने पावले उचलली असून त्यांना सात दिवसांच्या नोटिसा पाठवल्या आहेत. त्याचवेळी ज्या अनधिकृत लेडिज बार, लॉजवर यापूर्वी कारवाई झाली होती ाणि ज्यांनी अनधिकृत बांधकामे केली आहेत, ती तीन दिवसात तोडण्याचे आदेशही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी दिले. काही महिन्यांपूर्वी पालिकेने अशा बार आणि लॉजवर कारवाई केली होती.शहरातील हॉटेल्स आणि बारना सात दिवसांत अग्निशमन दलाची एनओसी सादर करण्याची नोटीस बजावली असून मुदतीत कागदपत्रे सादर केली नाही तर पालिका त्यांना सील ठोकणार आहे. त्यामुळे या व्यावसायिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून पालिकेची ही कारवाईच बेकायदा असल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.राज्य सरकारने २०१४ मध्ये काढलेल्या एका परिपत्रकानुसार अग्निशमन विभागाच्या परवान्यांचे कालबद्ध पद्धतीने नूतनीकरण करण्याची गरज नाही, असा दावा करून हॉटेलमालकांनी या कारवाईवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे पालिका आणि या व्यावसायिकांमधील वाद उफाळून आला आहे. यापूर्वी ठाणे पोलीस आणि पालिका प्रशासनाने संयुक्तपणे शहरातील अनधिकृत लेडिज बारवर कारवाई मोठी मोहिम राबविली होती. यामध्ये उपवन परिसराबरोबरच शहरातील सर्वच अनधिकृत लेडिज बार जमीनदोस्त केले होते. या कारवाईमुळे शहरातील बार संस्कृतीलाच खीळ बसली होती.ही कारवाई करूनही शहरात पुन्हा अनधिकृत लेडीज बार सुरू असल्याचा संशय असल्याने आता पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. शहरामध्ये काही ठिकाणी कारवाई करूनही अशा बारची किंवा लॉजेसची दुुरुस्ती करून त्यामध्ये पुन्हा लेडिज बार आणि लॉजेस सुरू झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.आयुक्तांनी मंगळवारी सर्व अधिकाºयांची तातडीची बैठक घेऊन अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांना या कारवाईबाबत नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. परिसरातील मालमत्तांना धोका पोचवणाºया बांधकामांवरही कारवाई होणार आहे.जीवाला धक्का पोचवणाºया बांधकामांवर कारवाईयाविषयी प्रभाग समिती स्तरावर परिमंडळ उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या प्रभाग समितीतंर्गत अशा अनधिकृत लेडिज बार आणि लॉजेसची यादी तयार करून पुरेशा पोलीस बंदोबस्तात ते तत्काळ तोडण्याचे आदेश दिले. दरम्यान जुन्या लेडीज बार किंवा लॉजशिवाय नवीन काही बार तयार झाले असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे आदेशीर आयुक्तांनी दिले आहेत. लोकांच्या जीवाला, परिसरातील मालमत्तांना धोका पोचवणाºया बांधकामांवर कारवाईचे आदेश उपायुक्तांना देण्याचा निर्णयही आयुक्तांनी घेतला.