शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
2
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'अत्यंत दळभद्री...'; नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानावरुन संतापले संजय राऊत
6
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
7
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
8
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
9
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
10
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
11
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
12
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
14
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
15
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
16
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
17
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
18
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
19
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
20
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरले ‘लोकमान्यांचे बाप्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 4:07 PM

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर ‘लोकमान्यांचा बाप्पा’ हा कार्यक्रम कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केला.

ठळक मुद्दे अभिनय कट्ट्यावर अवतरले ‘लोकमान्यांचे बाप्पा’‘गोंधळ गणपती उत्सवाचा’ हे पथनाट्य सादर’ हा कार्यक्रम असाच अभिनय कट्टा पुढे करत राहील : किरण नाकती

ठाणे: ३९३ क्र मांकाच्या अभिनय कट्ट्याचे विशेष आकर्षण होते ते म्हणजे समाज प्रबोधन करणारे पथनाट्य व ‘लोकमान्यांचा बाप्पा’ या कार्यक्र माचे सादरीकरण. समाजाला चांगल्या गोष्टींची आवड व समाजप्रबोधन करायचे असेल तर पथनाट्य सारखे दुसरे माध्यम नाही हे कट्ट्यावर प्रेक्षकांनी अनुभवले.सेंट मेरी हाय स्कूल (कल्याण) या शाळेतील मुलांनी ‘गोंधळ गणपती उत्सवाचा’ हे पथनाट्य सादर करून येणाऱ्या गणेशोत्सवाचे स्वागत आपण कशाप्रकारे करायचे आणि निसर्ग हानी न पोहोचवता रक्षण करायचे हे दाखवून दिले. तसेच ए.के.जोशी इंग्लिश स्कूल (ठाणे) या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छ सुंदर ठाणे’ हे पथनाट्य सादर केले. ‘स्वच्छता परमो धर्मा ’ असे म्हणत आपले ठाणे शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा कानमंत्र त्यांनी प्रेक्षकांना दिला. त्याचबरोबर ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘पूजा करू पंचमहाभूतांची, साथ सोडू वाईट विचारांची’ हे पथनाट्य सादर करून प्रदूषणमुक्त जीवन जगण्याचा विचार प्रकट केला. विद्यार्थीदशेत जेव्हा आपण समाजकल्याणाचा विचार करतो आणि ते प्रत्यक्ष नाट्यस्वरु पात सादर करतो. तेव्हा मनावर होणारे संस्कार हे पुढील जीवनाच्या वाटचालीला उपयुक्त ठरतात. हे या तिन्ही पथनाट्यातून उलगडले. त्यानंतर कट्ट्याच्या शेवटी ‘लोकमान्यांचा बाप्पा’ या कार्यक्र माचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणाद्वारे लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव सुरु करण्याचा हेतू काय होता आणि सध्याची परिस्थिती काय आहे या गोष्टींचा उलगडा करण्यात आला. आजच्या काळातला भक्त हा बाप्पापेक्षा दिखाव्याच्या मागे धावणारा असून फक्त पैसे कमवण्याचा सण म्हणून गणेशोत्सवाकडे पाहणारा आहे. परंतू स्वत: गणपती बाप्पा प्रकट होऊन लोकमान्य टिळकांचा गणपती बसवण्याचा उद्देश काय होता हे पटवून देतात. हे या सादरीकरणातून दाखवण्यात आले व त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिक करून स्वराज्य मिळेल पण त्याच सुराज्य करून टिकवून ठेवणे पुढे लोकांना जमणार का? यांचेही उत्तर मात्र प्रेक्षकांना गवसले. हे शेवटच्या आरतीमध्ये तल्लीन झालेल्या उपस्थितांच्या चेहºयावर झळकत होते. त्याचबरोबर कट्ट्याचे अध्यक्ष किरण नाकती यांनी पथनाट्याद्वारे समाजाला रु ळावर आणणाºया आणि प्रबोधन करणाºया सर्व बालकलाकार विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवाच्या आधीच दरवर्षी होणाºया ‘लोकमान्यांचा बाप्पा’ हा कार्यक्रम असाच अभिनय कट्टा पुढे करत राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवcultureसांस्कृतिकNatakनाटक