शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

ठाण्यात लागले ‘एकनिष्ठेच्या फळा’चे बॅनर; शरद पवार यांचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:35 IST

जितेंद्र आव्हाड यांचा मंत्रिमंडळ प्रवेश निश्चित असल्याची चर्चा

ठाणे : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात लावलेल्या ‘एकनिष्ठेचे फळ’ या फलकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या बॅनरवर महापुरुषांच्या फोटोंबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार तसेच आ. जितेंद्र आव्हाड यांच्या आईवडिलांचे फोटो झळकताना दिसत आहेत. त्यामुळे आव्हाड यांचा मंत्रिमंडळातील समावेश पक्का असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात तेच राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा होते. गणेश नाईक यांच्यासारखे काही सहकारी शरद पवार यांची साथ सोडून गेले, तेव्हा काहीही झाले तरी मी माझ्या साहेबांसोबत राहणार, अशी ग्वाही त्यांनी वेळोवेळी आपल्या भाषणात दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना आमदारांची पंचतारांकित हॉटेलांमध्ये व्यवस्था केली होती. त्या आमदारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आव्हाड यांनी पार पाडली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजित पवार यांनी शपथ घेतली, तेव्हा पवार कुटुंबातील वादळात आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याची नि:संदिग्ध ग्वाही आव्हाड यांनी दिली होती.राजकारणात आपल्याला शरद पवार यांनी संधी दिली व त्यांच्या प्रत्येक आदेशाचे आपण पालन करणार, असे ते सतत सांगत असतात.आव्हाड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे एकनिष्ठ राहिलेल्यांना त्याचे फळ मिळते, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. येत्या काही महिन्यांत ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून आव्हाड यांच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे राष्ट्रवादीची बांधणी करून काही नेत्यांच्या पक्ष सोडण्यामुळे पक्षाचे झालेले नुकसान भरून काढण्याकरिता त्यांना बळ मिळेल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस