‘आधार’शी खाती जोडून घेण्याचे बँकांना निर्देश
By Admin | Updated: April 1, 2017 05:54 IST2017-04-01T05:54:39+5:302017-04-01T05:54:39+5:30
ठाणे जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुमारे १९ लाख ८७ हजार खाती असून त्यापैकी ११ लाख २५ हजार २५० बँक खाती आधार क्र

‘आधार’शी खाती जोडून घेण्याचे बँकांना निर्देश
ठाणे : ठाणे जिल्ह्यात विविध बँकांमध्ये सुमारे १९ लाख ८७ हजार खाती असून त्यापैकी ११ लाख २५ हजार २५० बँक खाती आधार क्र मांकाशी, तर १७ लाख ८८ हजार ३०० खाती मोबाइल क्र मांकाशी जोडलेली आहेत. तसेच उर्वरित खाती संबंधित बँकांनी त्वरित आधार क्र मांक आणि मोबाइलशी जोडावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. तर, मार्चपर्यंत १०० टक्के खाती आधारसंलग्न करण्यासाठी विशेष मेळावे, कार्यक्र म घ्यावेत, असे लीड बँकेचे मुख्य व्यवस्थापक राजन जोशी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
डिजिटल पेमेंट सुविधांमध्ये आधार क्र मांक अत्यंत महत्त्वाचा असून बँकांनी सर्व खाती आधारशी जोडणे आवश्यक आहे. ९० टक्के खाती मोबाइलशी जोडली गेली असली, तरी अद्यापही जिल्ह्यातील ८ लाख ६१ हजार ७५० बँक खाती आधारशी जोडलेली नाहीत. ती त्वरित लिंक करण्यासाठी बँकांनी अधिक प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी डिजिटल पेमेंटपद्धतीचे व्यवहार करावेत, असेही त्यांनी या वेळी सूचित केले. आतापर्यंत ८५२ विविध बँक शाखांनी आधार क्र मांक जोडणीसाठी विशेष मेळावे घेतले आहेत, अशी माहिती या वेळी दिली. त्याचबरोबर, रोखमुक्त अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने मध्यंतरीच्या चलनबदलाच्या काळात बँकांनी अत्यंत संयमाने व परिश्रमपूर्वक परिस्थिती हाताळली, याबद्दल प्रशासनाच्या वतीने बँकांचे अभिनंदन केले. तसेच येणाऱ्या काळातही डिजिटल पेमेंट चळवळीला गती देण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज्यात कामगिरी चांगली
ठाणे जिल्ह्यामध्ये पंतप्रधान जनधन योजनेत तब्बल ११ लाख ८७ हजार ६८७ बँक खाती उघडल्याची माहिती या वेळी राजन जोशी यांनी दिली. त्या माध्यमातून बँकांमध्ये ३५७ कोटी २९ लाख रु पये जमा झाले आहेत. राज्यात ही कामगिरी चांगली आहे.