शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

ठाण्यात बँक कर्मचा-यांनी राबविले स्वच्छता अभियान: नौपाडयातील विविध भागांमध्ये साफसफाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 10:35 PM

सामाजिक बांधिलकी जपत ठाण्याच्या सुमारे ७० बँक कर्मचारी अधिका-यांनी एकत्र येत नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात स्वच्छता अभियान राबविले.

ठळक मुद्दे स्वच्छता पंधरवडयानिमित्त राबविली विशेष मोहीमबँक कर्मचा-यांसह अधिका-यांचाही सहभागनौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात राबविले अभियान

ठाणे: महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने देशभर राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानामध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ठाण्यातील ६० ते ७० कर्मचा-यांनी सहभाग घेतला. या स्वच्छता पंधरवडयानिमित्त नौपाडा प्रभागातील विविध भागांमध्ये अधिका-यांसह कर्मचा-यांच्या चमूने शनिवारी दिवसभर स्वच्छता अभियान राबविले.बँकेच्या वतीने संपूर्ण महाराष्टÑ आणि गोवा राज्यात १६ ते ३१ जानेवारी २०१८ दरम्यान हे अभियान राबविण्यात येत आहे. ठाण्यात हरिनिवास सर्कल, नौपाडा पोलीस ठाणे परिसर आणि गोखले रोड भागात राबविलेल्या या उपक्रमात बँकेच्या ठाणे परिमंडळाचे उपमहाव्यवस्थापक जी. अप्पाराव, सहायक महाव्यवस्थापक रविंद्र गुरव, गणेशकुमार तिवारी याशिवाय अनिल वाणी, अनंत पाटकर, संतोष वाकडे , ए. एन. बेग, कैलाश खोत, प्रकाश सांगळे, संदीप लोहकरे आदींसह बहुसंख्य कर्मचारी अधिका-यांनी सहभाग घेतला. ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि नौपाडा पोलिसांनीही बँक कर्मचा-यांना या अभियानात मोलाचे सहकार्य केल्याचे कर्ज विभागाचे व्यवस्थापक युवराज चौधरी यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भास्कर शिंदे, सुभाष ठाकूर आणि युवराज चौधरी यांनी विशेष मेहनत घेतली.सामाजिक बांधीलकीबँक प्रशासनाने यापूर्वीही गांधी जयंती सप्ताहाच्या दरम्यान शहरात स्वच्छता अभियान राबविले. तर सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पालिका शाळांसाठी पंखे तसेच वॉटर प्युरिफायरचेही मोफत वाटप केल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSBIएसबीआय