बँक कर्मचाऱ्याचा खातेदारांच्या रकमेवर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:41 IST2021-04-01T04:41:58+5:302021-04-01T04:41:58+5:30

अंबरनाथ : येथील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने खातेदारांच्याच रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन आरोपींना ...

The bank employee relies on the account holder's money | बँक कर्मचाऱ्याचा खातेदारांच्या रकमेवर डल्ला

बँक कर्मचाऱ्याचा खातेदारांच्या रकमेवर डल्ला

अंबरनाथ : येथील एका बँकेच्या कर्मचाऱ्याने खातेदारांच्याच रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना दोन एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंबरनाथ पश्चिमेला असलेल्या बँक ऑफ बडोदा या बँकेत हा प्रकार घडला. या बँकेत क्लार्क म्हणून काम करणाऱ्या सुमीत मंगलानी याने आपल्या बँकेतील १२ खातेदारांच्या रकमेचा अपहार केला आहे. या सर्व खातेदारांच्या खात्यातील तब्बल ११ लाख ६० हजारांची रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्यावर वळवून खातेदारांची फसवणूक केली. बँकेतील जी खाती मोबाईलशी लिंक नव्हती, त्या खात्यातून ऑनलाईन ही रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग केली. खातेदार आणि बँकेच्या ही बाब लक्षात आल्यावर बँकेच्या मॅनेजरने अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सुमित आणि खातेदार विजय गुप्ता या दोघांनाही अटक केली आहे. सुमित हा दिव्यांग आहे. दोघांनी आपापसात संगनमत करून अपहार केल्याचे तपासात उघड झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सगळ्या प्रक्रियेत आणखी कोणी सहभागी आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

Web Title: The bank employee relies on the account holder's money