मीरा भाईंदर, वसई, विरारमध्ये होळी, धूलिवंदनावर बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:40 IST2021-03-26T04:40:56+5:302021-03-26T04:40:56+5:30

मीरा रोड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाने होळी व धूलिवंदनासाठी २६ मार्च ते ...

Ban on Holi, Dhulivandana in Mira Bhayander, Vasai, Virar | मीरा भाईंदर, वसई, विरारमध्ये होळी, धूलिवंदनावर बंदी

मीरा भाईंदर, वसई, विरारमध्ये होळी, धूलिवंदनावर बंदी

मीरा रोड : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाने होळी व धूलिवंदनासाठी २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. नागरिकांनी घरीच सण साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केली आहे.

पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार २८ मार्च रोजी होळी, २९ मार्च रोजी धूलिवंदन आणि २ एप्रिल रोजी होणाऱ्या रंगपंचमीच्या अनुषंगाने २६ मार्च ते ६ एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केले आहेत. सार्वजनिक ठिकाणी झाडे, लाकडे तोडणे व त्याचे दहन करणे, पादचाऱ्यांवर रंग, पाणी व फुगे फेकणे, पिशव्यांचा वापर करणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावणे, अश्लील शब्द व घोषणा देणे, विकृत हावभाव करणे आदी कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल, रिसॉर्ट, सभागृहामध्ये धूलिवंदन-होळी कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये म्हणून पोलिसांनी मनाई आदेश लागू केले असून सण साधेपणाने घरच्या घरी साजरे करण्याचे आवाहन पोलिसांनी केली आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Web Title: Ban on Holi, Dhulivandana in Mira Bhayander, Vasai, Virar