शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Video : श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड, पोलिसांनी शिवसैनिकांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 20:07 IST

Eknath Shinde : कॅम्प नं-५ मधील शिवसैनिकांनी बालाजी किणीकर यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. 

सदानंद नाईक उल्हासनगर : एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शनिवारी खासदार श्रीकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना नवीन असतांना, रविवारी शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर कॅम्प नं-५ मधील शिवसैनिकांनी बालाजी किणीकर यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. 

एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर सुरवातीला संभ्रमात असलेले शहर शिवसैनिकांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याने, शिंदे समर्थकांची कोंडी झाली. शनिवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या गोलमैदान येथील जनसंपर्क कार्यालयाची तोडफोडकरणाऱ्या सहा शिवसैनिकवर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तर रविवारी मराठा सेक्शन येथील शिवसेना शहर मध्यवर्ती शाखेवर नगरसेवक शेखर यादव यांनी भले मोठे पोस्टर्स लावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. तसेच दुपारी शेखर यादव यांच्यासह शिवसेना शाखा प्रमुख, विभागप्रमुख व शिवसैनिकांनी बाल शिवाजी जिजामाता गार्डन येथे जिजामाता व शिवाजीं महाराज यांना पुष्पहार अर्पण करून शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच गद्दार यांचे काही खरे नाही. असा सूचक इशारा शिंदे यांच्या समर्थकांना दिला.

 कॅम्प नं-५ कैलास कॉलनी येथे शिवसेना विभागप्रमुख आदिनाथ कोरडे, लाल्या कुंचे, राजू घडायली, भगवान भांडे यांच्यासह शाखा प्रमुख, विभाग प्रमुख व शिवसैनिकांनी एकत्र येत आमदार बालाजी किणीकर, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात रविवारी दुपारी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी शनिवारी शिवसैनिकांना शांततेच्या मार्गाने विरोध करण्याचा सल्ला दिला होता. मात्र संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरत असल्याने, पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या होम जिल्ह्यातील उल्हासनगर मधून शिवसैनिकाकडून विरोध होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगरArrestअटकCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेना