दादरमध्ये हरवलेली बॅग ठाण्यात मिळाली; पाच हजारांसह बॅग परत केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 20:09 IST2018-02-17T20:05:27+5:302018-02-17T20:09:11+5:30

दादरमध्ये हरवलेली बॅग ठाण्यात मिळाली; पाच हजारांसह बॅग परत केली
ठळक मुद्देएका प्रवासीने जमा केली होती बॅगरोख रक्कमेसह कागदपत्रे
ठाणे : दादर लोकल प्रवासात गडबडीत विसरलेली बॅग प्रवासी विजय सुगदरे यांना ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाने शनिवारी दुपारी परत केली. परत केलेल्या बॅगेत रोख पाच हजार आणि १५ हजारांची मशीन आणि इतर कागदपत्रे होती. ही बॅग शनिवारी सकाळी विजय हे दादर स्थानकात उतरताना लोकलमध्ये विसरले होते. दरम्यान, ती बॅग एका प्रवाशाने ठाणे रेल्वे स्थानकातील प्रबंधक कार्यालयात जमा केली होती. विजय यांनी स्थानक प्रबंधक कार्यालयाशी संपर्क साधल्यावर येथे बॅग जमा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांची ओळख पटवून ठाणे स्थानक उपप्रबंधक विजयकुमार रजत यांनी ती बॅग त्यांच्याकडे सुपूर्द केली.