शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना दिलासा! अटकेनंतर एकाच दिवसात दोघांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 16:11 IST

Badlapur Sexual Assault Case: बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना काल रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Badlapur Sexual Assault Case:  बदलापूर बलात्कार प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात आलेले त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना काल रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणात गुन्हा घडल्यापासून सातत्याने पोलिसांना हुलकावणी देत असलेले संस्थेचे चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल बुधवारी रात्री पोलिसांनी अटक केली. आज दोघानाही कोर्टात हजर करण्यात आले, आधी कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती आता कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

भाजपाला आणखी एक धक्का; बडा नेता शरद पवारांना भेटला, 'घरवापसी'चा निर्णय पक्का झाला?

अटकेनंतर एकाच दिवसात उदय कोतवाल आणि तुषार आपटेला जामीन मिळाला आहे. कोर्टाने आधी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या दोन्ही आरोपींना एका प्रकरणात जामीन तर दुसऱ्या प्रकरणात अटकेची परवानगी मिळाली आहे.

राज्यासह देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदे हा गेल्या आठवड्यात पोलिसांसोबत झालेल्या कथित चकमकीत ठार झाला होता. मात्र या प्रकरणात सहआरोपी बनवण्यात आलेले बदलापूरमधील त्या शाळेतील दोन पदाधिकारी मात्र मात्र फरार असल्याने पोलीस प्रशासन आणि सरकारवर टीका होत होती. तसेच या वरून न्यायालयानेही खडेबोल सुनावले होते. अखेर पोलिसांनी या फरार पदाधिकाऱ्यांचा शोध घेत त्यांना कर्जत येथून ताब्यात घेतले आहे. बदलापूरमधील त्या शाळेचे सचिव तुषार आपटे आणि चेअरमन उदय कोतवाल यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. 

टॅग्स :badlapurबदलापूरCourtन्यायालयPoliceपोलिस